मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनाच्या (Samana) अग्रलेखातून भाजपवर (BJP) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मराठी भाषा भवनाचा कार्यक्रम गुढीपाडवा दिवशी झाला आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी मराठी भाषेवरून भाजपला टार्गेट केले आहे.
संजय राऊत यांनी अग्रलेखात म्हंटले आहे की, मरीन ड्राईव्हला मराठी भाषा भवन (Marathi Bhasha Bhavan) उभं राहिल.मात्र, अभिजात भाषेचा दर्जा मिळाव म्हणून सुरु असणारी लढाई सुरु आहे. केंद्राला मराठी संदर्भात ऐतिहासिक, प्राचीन आणि अर्वाचीन पुराव्यांचा अभ्यास या ठिकाणी करता येईल.
मराठी ही शिवरायांपासून ते क्रांतिविरांची भाषा आहे. मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्र निर्माण व्हावा म्हणून 105 हुत्तात्म्यांनी बलिदान दिलं. संत ज्ञानोबा तुकोबांची भाषा मराठी आहे.
महात्मा गांधींचं आंदोलन, गिरणी कामगारांचं आंदोलन याचा संदर्भ देत संजय राऊत यांनी मराठी भाषा ही लढवय्या माणसांची भाषा आहे. असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
देशासाठी सीमेवर लढणारी, प्राण त्याग करणाऱ्यांची मराठी भाषा आहे. तोच लढवय्या वारसा प्रबोधनकार ठाकरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चालवत आहेत, असा उल्लेख अजित पवारांनी केल्याचा संदर्भ संजय राऊत यांनी दिला आहे.
मुंबईत व्यापार धंदा करायचा, मिळेल त्या मार्गानं पैसे कमवायचे. मराठीत व्यवहार करण्यास दुकानावर पाटी लावण्यास सांगितलं की महाभाग कोर्टात जातात. ही मस्ती उतरवण्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केला जाण्याची गरज आहे.
भाजपच्या किरीट सोमय्यासारखे लोक कोर्टात गेले. त्या लोकांनी मराठी भाषेविरुद्ध दावा मांडलाय. मराठी भाषा भवनाच्या उभारणीत अडथळे आणण्यासाठी ईडी वापरली जाईल, अशी भीती संजय राऊत यांनी व्यक्त केलीय.
मराठी भाषा संस्कृती, मराठी भाषेचा ठसा पुसण्याचा प्रयत्न सुरु आहे. मराठी तरणांनी उत्तुंग झेप घ्यावी यासाठी मराठी भवनातून काम व्हावं, गेली कित्येक वर्ष शिवसेना हे काम करतंय. असे म्हणत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन करुन मराठीचा द्वेष करणाऱ्यांच्या कानफटात मारली मराठी माणसांना ओळख दिली, स्वाभिमान दिला. गर्वानं जगायला शिकवलं.
मराठीच्या अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेऊन आपटायची हिंमत दिली. दिल्लीच्या तख्ताला अनेकदा महाराष्ट्रापुढं झुकावं लागलं आहे. महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यासाठी 5 वर्ष लढावं लागलं, असेही राऊत म्हणाले आहेत.
महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याच्या लढाईसाठी महाराष्ट्राची निवड केली. त्याला शिवरायांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहे.
बाबरीवर हातोडे मारुन पुन्हा होय बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे, असं ठणकावणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांची मराठी भाषा आहे.
अमरनाथ यात्रेकरुचांच्या केसाला हात लावाल तर याद राखा या इशाऱ्यानं पाकड्या दहशतवाद्यांना धडकी भरवणारी मराठी भाषा आहे असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे.