Dairy Farming Business : ‘या’ जातीच्या म्हशींचे करा पालन,जास्त दुधासह मिळवा जास्त नफाही

अहमदनगर Live24 टीम, 05 एप्रिल 2022 Dairy Farming Business :-  देशात वाढत्या लोकसंख्येमुळे दुधाच्या मागणीतही दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे.त्यामुळे म्हशी पालनाचा आलेख गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढला आहे. म्हशींचे पालन शेतकऱ्यांसाठी अधिक उत्पन्नाचे साधन बनत आहे.

अशा वेळी जास्त दुध देणाऱ्या म्हशींची ही मागणी वाढत आहे. दुग्धव्यवसायात म्हैस पाळली तर कोणती म्हैस जास्तीत जास्त दूध देते आणि कोणती म्हैस पाळणे योग्य ठरेल असा प्रश्न अनेकदा शेतकरी बांधवांना पडतो. तर आपण सर्वाधिक दूध देणाऱ्या म्हशींच्या जाती बद्दल जाणून घेणार आहोत.

मुर्राह म्हैस :- मुर्राह म्हैस ही भारतात सर्वाधिक पाळली जाते. ही म्हैस दूध उत्पादनाच्या बाबतीत भारतात पहिल्या क्रमांकावर येते. ही म्हैस 2000 ते 4000 लीटरपर्यंत दूध देते. यापेक्षा जास्त उत्पादन घेण्यासाठी, तिला चांगला आहार देणे खूप महत्वाचे आहे.

जाफ्राबादी म्हैस :- दुग्ध व्यवसायातील जफराबादी म्हशीला देशभरात अधिक पसंती दिली जाते. त्याचे मूळ ठिकाण गुजरातमधील जाफराबाद आहे. ही जात 2000 ते 3000 लिटर दूध देते.

मेहसाणा म्हैस :- मेहसाणा म्हैस गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात आढळते. ही म्हैस दूध उत्पादनासाठी खूप लोकप्रिय आहे. गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थानमध्ये याचे मोठ्या प्रमाणावर पालन केले जाते. ही जात 1200 ते 2000 लिटर दूध देते.

पंढरपुरी म्हैस :- या जातीची म्हशी महाराष्ट्रात पाळली जाते. या म्हशीचे शिंग खूप लांब असते. पंढरपुरी म्हैस एकाच बॅचमध्ये 1000 ते 2000 लिटर दूध देते.

सुरती म्हैस :- सुरती म्हैस ही गुजरातची जात आहे. ही जात शेतकऱ्यांच्या अत्यंत आवडत्या म्हशींपैकी एक आहे. ही जात 1400 ते 1800 लिटर दूध देते. या जातीच्या म्हशीच्या दुधात 8 ते 12 टक्के फॅटचे प्रमाण आढळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe