मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुखाखातीत अनेक मुद्दे मांडले आहेत, तसेच त्यांनी पेट्रोल, डिझेल दरवाढीवरूनही केंद्र सरकारवर (Central Government) हल्लाबोल केला आहे.
पेट्रोल- डिझेल (Petrol-diesel) कर कमी करण्याबाबत बोलताना राज्याने पेट्रोल व डिझेलवरील कर कमी करावेत असे असेल तर केंद्रानेही आपले कर कमी करावेत, अशी जोरदार टीकाही अजित पवार यांनी विरोधकांवर केली आहे.
मात्र अजित पवारांच्या या विधानामुळे राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी होणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सवलत मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, २०२१-२२ मध्ये १४ टक्क्यांनी महाराष्ट्राचे (Maharashatra) उत्पन्न कमी झाले आहे. परंतु पत्रकारांच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की, कुठल्याही देशाचे, राज्याचा अर्थसंकल्प ज्यावेळी सादर केला जातो त्यावेळी तो अंदाज असतो. यावर्षी राज्यांमध्ये याप्रकारे उत्पन्न मिळेल.
त्यानुसार खर्च करु ही परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. दोन वर्ष कोरोनाची गेली त्यामुळे त्याचा अंदाज व्यक्त केला गेला. त्या – त्या वर्षी अंदाजापेक्षा कमी उत्पन्न मिळाले त्यामध्ये सरकारचा दोष नसतो उलट रिसोर्सेस वाढवण्याकरिता आपण प्रयत्न केला असे पवार म्हणाले.
दरम्यान,अजित पवार यांनी विविध पक्षाचे खासदार भूमिका मांडतील आमच्या परीने गॅसच्या किंमती कमी करण्याचा प्रयत्न केला, परंतु कमी किंमती केल्या तरी पुन्हा पेट्रोल – डिझेल व गॅसच्या किंमती वाढतच आहेत.
सध्या त्याचा आकडा कुठच्या कुठे जात आहे. यावर विविध पक्षाचे लोक आंदोलन करत आहेत. राष्ट्रवादीनेही (Ncp) आंदोलन केले आहे असेही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.