कोल्हापूर : भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा संजय राऊत हे शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांचे नसून शरद पवारांचे (Sharad Pawar) असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे किंवा शिवसेनेचे नव्हेत तर प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे समर्थक आहेत,

असे आपण वारंवार सांगत होतो. ते कालच्या घटनेवरून स्पष्ट झाले असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभेचा एका जागेसाठी पोटनिवडणूक लागली आहे. चंद्रकांत पाटील यांचा दौरा कोल्हापूरकडे आहे. यावेळी पाटील यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर कारवाई झाली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक तुरुंगात गेले. परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीने चौकशी केली.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कारवाई केली. केंद्रीय तपास यंत्रणांनी अनेक नेत्यांवर कारवाया केल्या. त्यावेळी शरद पवार यांना पंतप्रधानांना भेटून हा अन्याय आहे व तो थांबवा असे सांगायचे सुचले नाही.
परंतु, इतरांच्या बाबतीत निरीच्छ असणारे शरद पवार मात्र संजय राऊत यांच्या गळ्याशी प्रकरण आल्यानंतर मोदीजींची भेट घेतात. याच्यावरूनच आपण संजय राऊत यांच्याविषयी जे बोलत होतो ते स्पष्ट होते. असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
राऊत हे उद्धवजींचे आणि शिवसेनेचे नाहीत, ते पवार साहेबांचेच आहेत.#SanjayRaut#Shivsena#SharadPawar pic.twitter.com/8dASCzyCpq
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) April 7, 2022
चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांच्यावरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पराभव दिसू लागल्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांनी लोकांना आवडतील अशा योजनांचा उल्लेख करायला सुरुवात केली आहे.
त्यातून ते पाईपलाईनच्या योजनेच्या चाचणीचे वेळापत्रक जाहीर करत आहेत. परंतु, हे केवळ निवडणुकीसाठी आहे. लबाडाच्या घरचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.