Maharashtra Breaking news : राज्यात कधीही वीज भारनियमन सुरू होऊ शकते…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- मागणीच्या तुलनेत वीज उपलब्ध होत नसल्याने सध्या तीन ते चार हजार मेगावॉट विजेचा तुटवडा आहे.

मागणी अशीच वाढत राहिली तर राज्यात कधीही वीज भारनियमन सुरू करण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.

राज्यमंत्री तनपुरे शुक्रवारी नगरला आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘सध्या विविध ठिकाणांवरून वीज उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मात्र, मागणीही वाढत आहे. पाच एप्रिलला राज्यात २८ हजार ४८९ मेगावॉट एवढी विजेची विक्रमी मागणी नोंदविली गेली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावेळी ८.२ टक्क्यांनी मागणी वाढली आहे.

दररोज सरासरी २८ हजार मेगावॉट मागणी होते. निर्बंध खुले झाल्याने आता शेतीसह उद्योग व्यावसायही सुरू झाल्याने मागणी वाढली आहे. खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी केली जात आहे.

मार्च महिन्यात राज्याने प्रतियुनिट ८ रूपये ७ पैसे दराने ५७१ दशलक्ष युनिट वीज खरेदी केली. वीज खरेदी करण्याचे अधिकार आपल्या वीज कंपन्यांना देण्यात आले आहेत.

तरीही वीज भारनियमन करण्याची वेळ येईल, तेव्हा नियमानुसार त्याचे वेळापत्रक तयार केले जाईल. ज्या भागात चांगली वसुली आहे, त्या भागात कमी काळ भारनियमन आणि जेथे वसुली कमी आहे, तेथे जादा भारनियमन याप्रमाणे भारनियमन केले जाईल,’ असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News