अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- आज शनिवारी दिवसभर वीज बंद ठेवून दुरुस्तीची कामे करण्याचे वीज वितरण कंपनीने जाहीर केले होते. मात्र नागरिकांचा रोष लक्षात घेता ही कामे स्थगित ठेवण्यात आली आहेत.
त्यामुळे घोषित केल्या प्रमाणे आज वीज जाणार नाही. असे वीज कंपनीने सांगितले. अहमदनगर शहर आणि ग्रामीण भागात शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत वीज बंद ठेऊन कामे करणयात येणार होती.
मात्र गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा सतत खंडित होत आहे. त्यास विरोधात आंदोलने झाली. आणखी रोष वाढू नये यासाठी आजचे काम स्थगित करण्यात आले आहे अशी माहिती देण्यात आली