अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 Milk Production : जगात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पशुपालन केले जाते. महाराष्ट्रात तसेच आपल्या देशातही मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव पशुपालन करीत आहेत.
आपल्याकडे पशुपालन मुख्यता दुग्धोत्पादनासाठी (Milk Production) केले जात असते. पशुपालन या शेती पूरक व्यवसायामुळे शेतकरी बांधवांचे (Farmers) उत्पन्न निश्चितच वाढले आहे.
बहुतांशी पशुपालक शेतकरी (Livestock Farmers) दूध उत्पादनासाठी पशुपालन करतात यामुळे शेतकरी बांधव नेहमीच पशूंचे दूध वाढवण्यासाठी प्रयत्न करीत असतात.
जर आपण देखील पशुपालन (Animal Husbandry) करत असाल आणि आपणांस आपल्या पशूंच्या दूध उत्पादन क्षमतेत वाढ करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला अगदी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे लागणार आहे.
शेतीमध्ये ज्या पद्धतीने नियोजन करून पिकांची पेरणी ते काढणीपर्यंतचा प्रवास गाठावा लागतो अगदी त्याच पद्धतीने पशुपालन व्यवसायातून देखील दूध उत्पादन वाढवण्यासाठी नियोजन पद्धतीने काम करावे लागणार आहे.
अशा पद्धतीने वाढेल पशूची दूध उत्पादन क्षमता
•जेव्हा गाय किंवा म्हैसच्या प्रसूतीसाठी एक महिना शिल्लक राहील तेव्हा त्या जनावराला 10 मि.ली. 25 दिवस दररोज Adder-H द्या म्हणजे त्याच्या शरीरात काही विकार असल्यास ते बरे होतील. जर पशूच्या शरीरात कुठलाच विकार नसेल तर ते पशु सदृढ बनेल आणि दुधाच्या उत्पादनात देखील वाढ होईल. जनावराच्या प्रसूतीसाठी सुमारे 15 दिवस शिल्लक राहिले की त्या जनावराला दररोज 100 ग्रॅम एनबूस्ट पावडर खाऊ घालावे जेणेकरून जनावराच्या बाळाच्या विकासासाठी याचा फायदा होईल तसेच पुढील वेताला अधिक दूध देण्यास पुरेशी ऊर्जा त्या जनावराला मिळेल.
•प्रसूती झाल्यानंतर त्या दिवसापासून, आपण 100 मिली यूट्राविन जनावरांना 10 दिवसांसाठी द्यावे जेणेकरुन जनावर पूर्णपणे फलित होईल किंवा आपण त्याला पूर्णपणे जार टाकेल असं म्हणू आणि यामुळे गर्भाशय देखील योग्य प्रकारे स्वच्छ होईल. तसेच या दिवसापासून आठवडाभर 100 ग्रॅम एनबूस्ट पावडर सकाळ संध्याकाळ त्या जनावराला खायला द्या.
•जनावर प्रसूत झाल्याच्या सात दिवसांनंतर, आतड्यातील जंत Minworm 90ml किंवा Minfluc-DS बोलसने मारून टाकले जातात आणि Enerboost पावडर 100g दररोज 21 दिवसांसाठी घ्या.
•जनावर प्रसूत झाल्याच्या 11 व्या दिवसापासून, त्या जनावराला डिझामॅक्स फोर्टे बोलस 2 सकाळी, 2 संध्याकाळी आणि सिमलाज बोलस सकाळी एक संध्याकाळी एक या प्रमाणात 10 दिवस खायला द्या यामुळे जनावराच्या दूध उत्पादन क्षमतेत वाढ होईल.
•जनावर प्रसूत झाल्यानंतर एक महिन्यापासून दररोज 50 ग्रॅम बायोबिओन-गोल्ड पावडर खायला द्या जेणेकरुन जनावरांच्या दूध उत्पादनात वाढ होईल. याशिवाय असं केल्यास जनावर वेळेवर गर्भधारणा धारण करेल. जर तुम्ही या पद्धतींचे अनुसरन केले तर म्हशी तब्बल 20 ते 25 लिटर पर्यंत दूध देण्यास सक्षम बनतील आणि दरवर्षी सदर जनावर पारडूला जन्म देतील.