शरद पवार कायद्याचा मिसयूज करताहेत, हे भ्रष्टाचाराचे कॅन्सर आहेत; जयश्री पाटील आक्रमक

Content Team
Published:

मुंबई : काल शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या आंदोलनानंतर कोर्टाने वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना अटक केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (St Worker Protest) भडकवल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.

मात्र आज कोर्टाने त्यांचा जमीन अर्ज फेटाळला असून त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मात्र या सर्व प्रकारानंतर सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील (Jayshree Patil) यांनी पुन्हा पवार कुटुंबियांवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

जयश्री पाटील यांनी पवारांवर आरोप करत म्हणाल्या की, हे भ्रष्टाचाराचे कॅन्सर आहेत, शरद पवार, अजित पवार (Ajit Pawar) यांची ६०० कोटींची केस बाहेर काढली, त्याचा बदला घेण्यासाठी ही अटक करण्यात आली आहे.

कायद्याचा मिसयूज करताहेत शरद पवार, दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil). काही झालं तरी आम्ही लढणार, ज्याप्रकारे तुम्ही माझ्या पतीला अटक केली, ती चुकीची आहे. फक्त आणि फक्त टार्गेट करण्यासाठी केलं, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील यांच्यापासून जिवाला धोका आहे.

शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंची (Supriya Sule) ज्या जमिनी बळकावल्या आहे, त्याच्यामुळेच ही केस दाखल करण्यात आली, असा थेट आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे.

तसेच पवार कुटुंबियांवर आणि सरकारवर निशाणा साधताना जयश्री पाटील म्हणाल्या, बघा या कष्टकऱ्यांच्या भावना, हे माझे कष्टकरी आहेत, जे आझाद मैदानात ५ महिन्यापासून होते, हजारोंच्या संख्येने जमले होते, त्यावेळी कोणताही प्रकार घडला नाही, जेव्हा हे कष्टकरी पूर्णत: केस जिंकले, त्यानंतर सदावर्तेंनी सांगितलं, की तुम्ही जॉयनिंगची डेट आम्ही सांगू, आणि सुप्रिया सुळे म्हणत होत्या मी चर्चा करते.

कालच कशा त्या बाहेर आल्या. गेल्या ५ महिने त्या चर्चा का करत नव्हत्या, याच्यामागे काहीतरी कटकारस्थान आहे, असेही जयश्री पाटील म्हणाल्या आहेत. कष्टकऱ्यांनो, हे पाहा भगवान बुद्ध, महावीराची आठवण करा, आणि शांतेतेच्या मार्गाने चाला, जय श्रीराम, जय शिवाजी महाराज म्हणत त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना त्यांनी आवाहनही केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe