पवार साहेब एक मोठ नेतृत्व, हल्ल्यामागे भाजप किंवा फडणवीसांचा हात असल्यास खासदारकीचा राजीनामा देऊ; रणजितसिंह नाईक निंबाळकर

Content Team
Published:

सातारा : राष्ट्रवादीचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील एसटी कर्मचाऱ्यांकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त होत आहे, तसेच या प्रकरणात पोलिसांकडून अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांना ताब्यात घेतले असून त्यांना १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मात्र आता या घटनेवर माढ्याचे भाजपचे (BJP) खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Naik Nimbalkar) आपली भुमिका स्पष्ट केली असून यामागे भाजपचा हात असेल तर मी राजीनामा देईल असे ते बोलले आहेत.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवास स्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन व चप्पलफेक प्रकरणी निषेध व्यक्त केला असून त्यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची स्तुती करताना त्यांनी दाखवलेल्या धीराचे कौतुक केले आहे.

तसेच जर त्यावेळी सुप्रिया सुळे या पुढे नसत्या आल्या तर नक्कीच दुर्घटना घडली असती, असेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर निंबाळकर यांनी, पवार साहेबांच्या आम्ही राजकीय विरोधात असलो तरी महाराष्ट्राचं ते एक मोठ नेतृत्व आहेत. महाराष्ट्राचे नेते म्हणून त्यांचा आदर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

त्याचसोबत या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याच्या आरोपावर त्यांना विचारले असता, ते म्हणाले, या हल्ल्यामागे जर भाजपचा किंवा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा हात असल्याचा आपण आपल्या खासदाकीचा राजीनामा देऊ असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच आपला देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या संस्कृतीवर विश्वास असल्याचेही नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe