“काही लोकांना इच्छा असेल त्यांनी खुशाल मला बदनाम करावं”

Content Team
Published:

नागपूर : राज्यात सध्या कोळशाच्या (Coal) टंचाईमुळे वीज लोडशेडिंग (Power loadshedding) चालू आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. तर विरोधी पक्षाकडून महाविकास आघडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार टीका करण्यात येत आहे. यावर ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत (Energy Minister Dr. Nitin Raut) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

कोल इंडिया लिमिटेड (Coal India Limited) ही कंपनी देशातल्या सर्व वीज कंपन्यांना कोळसा पुरवते. त्यांच्या व्यवस्थापनामुळे (Management) समस्या निर्माण झाली आहे, कोळशाच्या उपलब्ध परिस्थितीनुसार दररोज कोळसा दिला जातो.

या स्थितीमध्ये फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशाची परिस्थिती आहे. देशाची परिस्थिती नाही तर केंद्रीय मंत्र्यांनी (Union Minister) सर्व राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांसोबत चर्चा का केली. तुम्हाला कोळसा खरेदी करायचा असेल तर इम्पोर्टेड कोळसा खरेदी करावा, असं सांगितलं.

याचा अर्थ देशांमध्ये आणि राज्यांमध्ये हा प्रश्न निर्माण झालाय. कोरोनानंतर विजेची मागणी वाढली आहे. मात्र राज्य सरकारने पूर्णपणे व्यवस्थापन केले आहे. अधिकारी आमचे रोज नजर ठेवून आहेत. बैठका घेत आहेत.

ही वेळ या देशात दुसऱ्यांदा आलेली आहे. राज्य सरकारची यात अजिबात चूक नाही. आम्हाला आता कोळसा वापरून पावसाळ्यासाठीसुद्धा साठा करून ठेवायचा आहे, असे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, राज्यामध्ये जी संकटे निर्माण झालं ते कुणाच्याही भांडणामुळे निर्माण झालेलं नाही. आम्ही काम करतो आहोत.

मात्र काही लोकांना इच्छा असेल त्यांनी खुशाल मला बदनाम करावं. मात्र दोन वर्षांत अडीच वर्षात आम्ही आजही व्यवस्थित पुरवठा करू शकलो.

मात्र केंद्र सरकारने बँकांना पत्र लिहून महाडिस्कोला कर्ज देऊ नका, असं पत्र दिलं आहे. ग्रामविकास खात्याने 8 हजार कोटी रुपये दिले नाहीत. त्यामुळे आमची थोडी कुचंबना झाली आहे. त्यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. तक्रार दिली आहे. असेही ते म्हणाले.

नितीन राऊत यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, जर आम्हाला हे पैसे मिळाले तर वीज घ्यायला शक्य होईल. 19 तारखेपर्यंत मी नियोजन केलेलं आहे. सर्व परिस्थिती सुरळीत होईल. सर्व पर्यायांवर आम्ही लढतो आहोत.

बँका आम्हाला कर्ज द्यायला तयार नाही. म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. रावसाहेब दानवेंनी आरोप करण्यापेक्षा चार बोट आपल्याकडे आहेत हे विसरू नये. आरोप करणे खूप सोपे आहे.

मात्र राज्य आमचं असेल तर विरोधकांचाही आहे. त्यामुळे सकारात्मक विचार करावा. यामध्ये चर्चा करून विचारविनिमय करून हा प्रश्न कसा सुटेल, यासाठी प्रयत्न करावा असेही ते म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe