Health Marathi News : ‘या’ 2 गोष्टींमुळे पांढऱ्या केसांची समस्या होईल दूर; केस मजबूत- काळे आणि मुलायम होतील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Health Marathi News : आजकालच्या जीवनात तरुण मुलांना किंवा मुलींना कमी वयातच अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. केस (Hair) पांढरे होणे, केस गळणे, केस फुटणे यासारख्या समस्या (Problem) तरुण वयात (Young age) होऊ लागल्याने अनेक जण त्रस्त आहेत.

पांढरे केस होण्याचे कारण

पांढऱ्या केसांच्या समस्येवर मात करण्यासाठी त्याची कारणे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की शरीरात पोषक तत्वांची (Nutrients) कमतरता असल्यास केस पांढरे होऊ लागतात.

याशिवाय तणाव, धूळ-माती, खराब जीवनशैलीमुळेही केस पांढरे होऊ शकतात. असे काही घरगुती उपाय आहेत, ज्यामुळे केस पांढर्‍या होण्याच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

1. मेथी दाण्याने केस पांढरे होण्याची समस्या संपेल

मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.
त्यानंतर सकाळी बारीक करून घ्या.
आता हे सर्व केसांना लावा.
नंतर आपले केस धुवा.
तुम्ही मेथीचे दाणे खोबरेल तेल आणि बदामाच्या तेलात मिसळूनही लावू शकता.

2. चहाच्या पानामुळे केस पांढरे होण्याची समस्या संपेल

चहाची पाने पाण्यात उकळा.
आता ते थंड होण्यासाठी सोडा.
पाणी थंड झाल्यावर ते मुळांना लावा.
साधारण 1 तासानंतर केस सामान्य पाण्याने धुवा.
असे महिन्यातून 5 वेळा केल्यास फरक दिसून येईल.