Naval Dockyard CO-OP Bank : पदवीधर असाल तर ‘या’ ठिकाणी सुरू आहे भरती, बघा कोणती पदे आणि किती रिक्त जागा…

Content Team
Published:
Naval Dockyard CO-OP Bank Bharti

 

Naval Dockyard CO-OP Bank Bharti : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँक मुंबई येथे विविध जगांसाठी भरती सुरु आहे, या भरती अंतर्गत कोणत्या पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत, आणि किती जागा भरल्या जाणार आहेत जे जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा.

वरील भरती अंतर्गत लिपिक पदाच्या एकुण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2024 आहे. लक्षात घ्या देय तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

शैक्षणिक पात्रता

वरील पदांसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई येथे सुरु आहे.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 18- 30 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.

ई-मेल पत्ता

अर्ज recruitment@navalbank.com या ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2024 आहे.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिल्या प्रमाणे पाठवावेत.

-उमेदवारांना अर्जाची हार्ड कॉपी आणि अॅडमिट कार्ड नेव्हल डॉकयार्डला पाठवण्याची आवश्यकता नाही.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.