इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शनिवार राहणार खास; शालेय शिक्षण विभागाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

Ajay Patil
Published:
education department decision

 

अगदी शालेय जीवनाच्या सुरुवात म्हणजेच पहिलीपासून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षण आणि शाळेविषयी आवड निर्माण व्हावी तसेच शाळा व अभ्यास हे ओझे न वाटता त्याबद्दल एक आवड निर्माण व्हावी म्हणून या शैक्षणिक वर्षापासून सरकारच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

आपण पाहतो की इयत्ता पहिली ते आठवी हा जो शैक्षणिक कालावधी असतो यामध्ये बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये घट येते. त्यामुळे या समस्येवर उपाय म्हणून जे प्रयत्न करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आता राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षण आणि शाळेबद्दल आवड निर्माण होईल याबाबत शंका नाही.

 अभ्यासाचा ताण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

याबाबत सविस्तर वृत्त असे की, इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अभ्यास हा नकोसा किंवा ओझे वाटू नये तसेच  त्यांच्या मनामध्ये शाळेविषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने आता प्रत्येक आठवड्यातील प्रत्येक शनिवारी दप्तराविना शाळा भरवली जाणार आहे.

म्हणजेच विद्यार्थ्यांना विना दप्तर शनिवारी शाळेत जावे लागणार आहे. विशेष म्हणजे हा महत्वपूर्ण उपक्रम असून त्याची अंमलबजावणी 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार असून यासंबंधीचा महत्त्वपूर्ण आदेश शालेय शिक्षण विभागाने सर्व शिक्षणाधिकाऱ्यांसाठी काढला आहे.

 हा निर्णय घेण्यामागील प्रमुख कारणे

बऱ्याचदा इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये दप्तराचे ओझे किंवा अभ्यासाचा ताण यामुळे अनेक मानसिक परिणाम होतात किंवा मानसिक ताण वाढतो. त्यामुळे खबरदारी घेत आता त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहावे व या गोष्टीला प्राधान्य देणे खूप गरजेचे असल्यामुळे या प्रकारचे निर्णय घेतले जात आहे.

याच निर्णयाचा भाग म्हणून जर आपण बघितले तर आता सकाळच्या सत्रात  ज्या काही शाळा भरतात त्या आता सकाळी साडेसात वाजता न भरता सकाळी नऊ वाजता भरणार आहेत. तसेच सोमवार ते शुक्रवार पर्यंत विद्यार्थ्यांना पुस्तकी धडे शिकवले जातील व आठवड्यातील प्रत्येक शनिवारी मात्र विद्यार्थ्यांना दप्तराविना शाळेत बोलावले जाणार असून त्या दिवशी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जी आवड असेल त्या आवडीला प्रोत्साहन व प्राधान्य दिले जाणार आहे.

त्यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असणारा असून शिक्षक कला तसेच ऐतिहासिक किंवा प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणे तसेच खेळ व स्काऊट गाईड, प्रेरणात्मक कथा सांगणे असे उपक्रम राबवणार आहेत. यामागील प्रमुख देश पाहिला तर तो म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासापासून विश्रांती भेटेल व ते सोमवारी म्हणजेच नवीन आठवडा सुरू होईल तेव्हा उत्साहाने शाळेत येतील व अभ्यास देखील करतील. हा प्रमुख उद्देश शालेय शिक्षण विभागाचा आहे.

 शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून बदलणार पहिली दुसरीचा अभ्यासक्रम

तसेच इयत्ता पहिली व दुसरीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात येणार असून त्यासंबंधीचा मसुदा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून तयार करण्यात आला असून त्यावर आता सूचना आणि हरकती देखील मागवण्यात आलेला आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून संबंधित मसुदा अंतिम केला जाईल व त्यानंतर नवीन अभ्यासक्रम 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून लागू केला जाणार आहे.