April Crop: एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवाड्यात या पिकांची लागवड करा आणि कमवा बक्कळ पैसा

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2022 April Crop :- एप्रिल महिन्याचा दुसरा पंधरवडा आता सुरु झाला आहे, या एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात शेतकरी बांधवांनी (Farmers) कोणत्या पिकाची लागवड करणे अधिक फायदेशीर असेल या विषयी आज आपण जाणुन घेणार आहोत.

शेतकरी बांधवांनी हंगामानुसार आणि योग्य नियोजन करून जर पिकांची निवड केली तर निश्चितच त्यांना फायदा मिळणार आहे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊक आहे की, एप्रिलच्या पहिल्या पंधरवाड्यात शेतकरी बांधव रब्बी हंगामातील पिकांची (Rabbi Season) काढणी उरकून घेतात आणि आगामी उन्हाळी हंगामासाठी (Summer Season) तयारी करतात.

मात्र यादरम्यान शेतकरी बांधवाकडे सुमारे दोन महिन्यांचा कालावधी असतो, अर्थात शेतकरी बांधवांचे शेत सुमारे दोन महिने रिकामे असते. अशा परिस्थितीत या रिकाम्या शेतात शेतकरी बांधव अनेक गोष्टींची लागवड करून चांगला नफा कमवू शकतात.

»एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यात ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असेल त्यांनी मुगाची लागवड (Cultivation of Kidney Bean) करावी असा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देत असतात. मूग (Green Gram) हे पीक अल्प कालावधीतच काढणीसाठी तयार होत असते.

या पिकाला काढणीसाठी 60 ते 67 दिवस लागतात. या पिकाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याची लागवड केल्याने जमिनीची सुपीकता वाढते. यामुळे या पिकाची लागवड करण्याचा सल्ला कृषी वैज्ञानिक देखील देत असतात.

»शेतकरी बांधव एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात भुईमुगाची पेरणी (Peanut Farming) देखील करू शकता, या पिकातून देखील शेतकरी बांधवांना लवकरच चांगला नफा मिळणार

»ज्या शेतकरी बांधवांना रब्बी हंगाम (Rabbi Crop) आणि उन्हाळी हंगाम या दरम्यान असलेल्या काळात शेत ओसाड न पडू देता शेती करायची असेलतर ते शेतकरी संपूर्ण एप्रिलमध्ये मक्याच्या साठी या वाणाची लागवड करू शकतात.

»सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकर्‍यांची इच्छा असेल तर शेतकरी बांधव त्यांची जमीन अधिक मजबूत करण्यासाठी उडीद, चवळी किंवा मूग इत्यादी पिके लागवड करू शकतात. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, त्याचा वापर हिरवळीचे खत बनवण्यासाठी होतो.

शेतकऱ्यांनी पिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हिरवळीचे खत हे आजकाल अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी स्वत:च्या शेतात हिरवळीचे खत तयार केल्यास त्यांना ते बाहेरून विकत घ्यावे लागणार नाही, त्यामुळे त्यांच्या पैशाची बचत होईल. निश्चितच एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यात रिकाम्या पडलेल्या शेताचा फायदा घेत शेतकरी बांधव चांगला नफा कमवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe