Crop Damage: अवकाळीने पुन्हा आणलं डोळ्यात पाणी!! द्राक्ष, ज्वारी पिकाचे लाखोंचे नुकसान

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2022 Crop Damage: मागील खरीप हंगामात (Kharif Season) निसर्गाच्या लहरीपणामुळे (Climate Change) शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले होते.

खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) खरीप पिकांचे (Kharip Crop) मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते.

खरीप हंगामात शेतकरी बांधवांना उत्पादन खर्च काढणे देखील मुश्किल झाले होते. कसाबसा शेतकरी राजा यातून सावरत रब्बी हंगामाकडे (Rabbi Season) वळला होता.

रब्बी हंगामात देखील निसर्गाचा लहरीपणा कायम बघायला मिळाला आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका रब्बी हंगामातील पिकांना (Rabbi Crop) बसला असून यामुळे फळ बागायतदार (Fruit Grower) देखील मोठे अस्वस्थ झाले आहेत.

नुकत्याच दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात (Solapur District) अवकाळी पावसाने (Untimely Rain) थैमान घातले. याचा सर्वाधिक फटका बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला.

उंबर्गे, मांडेगाव, कळंबवाडी, भानसळे, खडकोणी या परिसरात दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. अवकाळी पावसासमवेतच वादळी वारे देखील या परिसरात बघायला मिळाले यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि काही ठिकाणी गारपीट देखील झाली यामुळे परिसरातील शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडला आहे.

सध्या तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. काही शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामातील गहू व ज्वारी पिकाची काढणी उरकली असून काही शेतकर्‍यांचे ज्वारी व गहू पीक अजूनही शेतातच उभे आहे.

या अवकाळी पावसाचा अशा पिकांना मोठा फटका बसला आहे. रब्बी हंगामातील ज्वारी व गहू व्यतिरिक्त द्राक्ष (Grape Farming), आंबा या फळबाग पिकांना देखील या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. बार्शी तालुक्यातील शेतकरी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी करत असतात.

ज्वारी हे पीक तालुक्याचे मुख्य पीक म्हणून ओळखले जाते. मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील मुख्य पिकाला मोठा फटका बसला आहे.

ज्वारीचे पीक काढणीच्या अवस्थेत असतानाच आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.

ज्वारी व्यतिरिक्त द्राक्ष बागांना देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. मांडे गाव येथील एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला देखील या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.

या अवकाळी पावसामुळे प्रभाकर मिरगणे यांची दीड एकरावरील द्राक्ष बाग आता भुईसपाट झाली आहे. विशेष म्हणजे अवकाळी पाऊस पडण्याआधीच प्रभाकर यांच्या द्राक्ष बागेचा सौदा झाला होता आणि फक्त हार्वेस्टिंग शिल्लक राहिली होती.

प्रभाकर यांच्या द्राक्षेला साठ रुपये प्रतिकिलो एवढा बाजार भाव मिळाला होता. मात्र द्राक्षाची हार्वेस्टिंग होण्याआधीच अवकाळी पाऊस आल्याने प्रभाकर यांच्या तोंडी आलेला घास हिरावला गेला असल्याचे सांगितले जात आहे.

यामुळे प्रभाकर यांचे सुमारे 30 ते 40 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या अवकाळी पावसामुळे बार्शी तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe