Animal Husbandry: उन्हाळ्यात या पद्धतीने घ्या दुभत्या जनावरांची काळजी; वाचा याविषयी सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2022 Animal Husbandry: देशातील शेतकरी बांधव (Farmers) शेती समवेतच शेतीपूरक व्यवसाय (Agricultural business) मोठ्या प्रमाणात करत असतात. शेती (Farming) पूरक व्यवसायात शेतकरी बांधव पशुपालनास विशेष पसंती दर्शवितात.

पशुपालक शेतकरी बांधवांसाठी (Livestock Farmer) आजची बातमी ही विशेष खास आहे. उन्हाळ्यात (Summer Season) जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागते,

कारण उन्हाळी हंगामात तापमान जास्त असल्याने जनावरांमध्ये आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते. साधारणपणे उन्हाळ्यात पचनसंस्थेशी संबंधित समस्या प्राण्यांमध्ये येतात.

एवढेच नाही, प्राण्यांच्या नवजात बालकांना देखील खूप त्रास होतो. उन्हाळ्यात, दुभत्या जनावरांची (dairy animals) दूध देण्याची क्षमता देखील कमी होते, तसेच त्यांची रोग प्रतिकारकशक्ती देखील कमी होते.

त्यामुळे पशुपालन (Animal Husbandry) व्यवसायाचे मोठे नुकसान होउ शकते. यामुळे आज आपण उन्हाळ्यात प्राण्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती देणार आहोत.

उन्हाळ्यात जनावरांची अशी घ्या काळजी
»उन्हाळ्याच्या हंगामात उष्णतेची लाट (Heat wave) असते, जी जनावरांसाठी अत्यंत हानिकारक असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या कडक उन्हापासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी गोठ्यावर ज्यूटच्या पोत्याचा पडदा बसवावा असा सल्ला दिला जातो.
»उन्हाळ्यात जनावराने वासराला (Calf) जन्म दिला तर त्या वेळी तोंडातून वाहणारा सर्व श्लेष्मा बाहेर काढावा, जेणेकरून वासराला श्वास घेण्यास त्रास होणार नाही.
»उन्हाळ्यात जनावरांना हिरवा चारा खायला द्यावा कारण की, हिरव्या चाऱ्यात पाण्याचे प्रमाण मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते.
»उन्हाळ्यात जनावरांच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे जेणेकरून जनावरे सदृढ राहतील.
»उन्हाळ्यात जनावरांना आजार होण्याचा धोका असतो, त्यामुळे वेळेवर लसीकरण करण्याचा सल्ला देखील दिला जातो.
»उन्हाळ्यात तापमान अधिक असते म्हणून रात्री जनावरे उघडे सोडा, जेणेकरून ते मोकळ्या हवेत राहू शकतील.
»प्राण्यांच्या गोठ्याच्या आजूबाजूला नेहमी हिरवीगार झाडे लावा, जेणेकरून जाणवरांना सावली आणि शुद्ध हवा मिळेल.

भारतात शेतकरी बांधव अतिरिक्त उत्पन्नासाठी शेती समवेतच पशुपालन मोठ्या प्रमाणात करत असतात. असे असले तरी पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या पशुधनाची मोठी काळजी घ्यावी लागते.

यामुळे ऋतूनुसार जनावरांची काळजी घेणे अतिशय महत्वाचे ठरते. उन्हाळ्यात दुधारू जनावरांची काळजी घेतली नाही तर पशुपालक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो, यामुळे उन्हाळ्यात जनावरांची काळजी घेणे महत्वाचे ठरत असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe