Successful Farmer: मल्टिनॅशनल कंपनीतील नोकरी सोडून ‘हा’ पट्ठ्या करतोय शेती; फक्त 1,000 पपईच्या झाडांनी बनवले लखपती

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 Success story of young farmer :- देशातील नवयुवक अलीकडे शेती पासून दुरावत चालले आहेत. मात्र असे असले तरी बिहारच्या (Bihar) जमुई जिल्ह्यातून एका नवयुवक शेतकऱ्याची यशोगाथा (Success story of young farmer) संपूर्ण बिहार मध्ये मोठ्या चर्चेत आहे.

याचे कारण असे की जमुईच्या अंकित राज शहरातील मल्टिनॅशनल कंपनीमधील (multinational company) चांगल्या तगड्या पगाराची नोकरी सोडून गावाकडे परतला आणि शेती करू लागला.

अंकित इंजिनिअर म्हणुन चांगल्या पगारावर एका एमएनसी मध्ये काम करत होता. 30 वर्षीय तरुण तडफदार अंकित इंजिनिअर असला तरी देखील लहानपणापासूनच त्याला गावाची ओढ होती.

यामुळे चांगल्या कंपनीत नोकरी असूनही तो शहरातून निघाला आणि आपल्या गावी अर्थात झाझाला पोहोचला. गावाकडे परतल्यानंतर त्यांनी उदरनिर्वाह भागवण्यासाठी शेती करण्याचा निश्चय केला.

या अनुषंगाने त्याने पपईची लागवड (Papaya cultivation) केली. त्याने फक्त 1 बिघा शेतात पपईची रोपे लावली. एक बिघा क्षेत्रात अंकित यांनी एक हजार पपई रोपांची लागवड केली.

यापासून सध्या या अवलियाला महिन्याला सुमारे 50 हजारांचे उत्पन्न मिळत आहे. अंकितने सांगितले की, ते सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहेत.

ते शेतीसाठी कोणतेही रासायनिक तसेच बाहेरील खत वापरत नाहीत. त्यांनी पपईचे एक रोप 6 बाय 6 या अंतरावर सेंद्रिय पद्धतीने लावली.

पपई लागवडीपासून ते काढणीपर्यंत सरासरी 6 ते 9 महिने लागतात. या नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी पपई फळबाग जोपासण्यासाठी सुमारे दोन लाख रुपये उत्पादन खर्च अंकित यांना आला आहे.

अंकितने सांगितले की, जर मार्केट चांगले असेल तर वर्षाला 6 लाखांहून अधिक कमाई होते. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या अंकितने पुढे अधिक माहिती देताना सांगितले की, ज्या शेतकरी बांधवांना पपईची लागवड करायची असेल त्यांनी प्रथम कमी जमिनीवर रोपे लावून सुरुवात करावी.

पपईच्या शेतीतून शेतकरी बांधवांना चांगले उत्पन्न मिळू लागले की मग पपईच्या अधिक झाडांची लागवड करणे योग्य राहील.

त्यांनी सांगितले की, त्यांनी उत्पादित केलेली पपई जमुई आणि देवघर (झारखंड) च्या मंडईत विक्रीसाठी पाठवली जाते. एवढेच नाही तर थेट खरेदीदार त्यांच्या बांधावर येऊन पपई विकत घेऊन जातात.

बांधावर पपई 40 रुपये किलो दराने विकली जाते. कोरोना महामारीच्या काळात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. परिणामी लोकांना शहरात उदरनिर्वाह भागत नसल्याने मूळ गावी परतावे लागले.

तरुणांच्या या नानाविध अडचणी आपल्या डोळ्यांनी बघितल्या आणि म्हणुन अंकितने गावातच शेती करण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे यासाठी त्याला त्यांच्या कुटुंबीयांनीही साथ दिली.

अंकितने पपईच्या शेतीतून गावातील अनेक तरुणांना रोजगारही दिला आहे. आजूबाजूच्या गावातील लोकही अंकितकडे पपईची शेतीची माहिती घेण्यासाठी येतात. अंकित देखील अशा लोकांना चांगली माहिती देत असतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!