UPSC Interview Questions : फक्त 40 मिनिटे रात्र असणारा देश कोणता? UPSC मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाची उत्तरे जाणून घ्या सविस्तर

UPSC Interview Questions : देशात दरवर्षी UPSC सारख्या परीक्षा घेतल्या जातात. मात्र या परीक्षेमध्ये (UPSC Exam) पास झाल्यानंतर महत्वाचा टप्पा मानला जातो तो म्हणजे मुलाखत (Interview) होय. मुलाखतीत असे काही प्रश्न विचारले जातात ते ऐकून मुलखात देणारा उमेदवार (Candidate) गोंधळात पडू शकतो.

परीक्षांमधील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे UPSC IAS परीक्षा. या परीक्षेतील लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखत पूर्ण करण्यासाठी सर्वात जास्त गरज असते ती म्हणजे ‘आत्मविश्वास’ आणि ‘चौकटीच्या बाहेर’ विचार करण्याची क्षमता.

IAS मुलाखतीचे प्रश्न खूप चर्चिले जातात. यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व आणि मुख्य परीक्षा जितकी कठीण तितकीच मुलाखत (IAS Interview) अधिक कठीण असते.

UPSC मुलाखतीचे प्रश्न उमेदवारांच्या IQ चाचणीसाठी विचारले जातात. कधी कधी हे प्रश्न फारच विचित्र असतात तर कधी ते अतिशय महत्त्वाच्या विषयावर आधारित असतात.

त्यामुळेच नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होण्यात चांगली माणसे घाम गाळतात, असे म्हणतात. चला तर मग आम्‍ही तुम्‍हाला काही अवघड प्रश्‍न (Questions) आणि त्यांची सडेतोड उत्तरे सांगत आहोत.

प्रश्न: जगातील सर्वात शुद्ध पाणी कोणत्या देशात आहे?
उत्तर: जगातील सर्वात शुद्ध पाणी डेन्मार्क देशात आहे, जेथे बाटलीबंद पाण्यापेक्षा चांगले नळाचे पाणी येते. यानंतर, आइसलँडमध्ये, जिथे 95 टक्के पाणी जमिनीतील स्प्रिंगमधून येते.

प्रश्न: मनुष्यानंतर सर्वात बुद्धिमान प्राणी कोणाला मानला जातो?
उत्तरः डॉल्फिन

प्रश्न : अशी कोणती गोष्ट आहे जी पाणी प्यायल्यानंतर मरते?
उत्तर: तहान

प्रश्न : बाजारात कोणते फळ उपलब्ध नाही?
उत्तरः कष्टाचे फळ.

प्रश्न: लहानपणापासून वृद्धापकाळापर्यंत शरीराचा कोणता भाग वाढत नाही?
उत्तर: डोळा.

प्रश्न: असा देश जिथे फक्त 40 मिनिटे रात्र असते?
उत्तर: नॉर्वेजियन.

प्रश्न: जर एक भिंत बांधण्यासाठी आठ माणसांना 10 तास लागले, तर ती बांधण्यासाठी चार माणसांना किती वेळ लागेल?
उत्तर: अजिबात वेळ नाही, कारण ती आधीच आहे.