मुंबई : सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून अनेक चांगली कामे मार्गी लागतात. सध्या आधुनिक जगात सर्वजण सोशल मीडियाशी निगडित असतात, त्यामुळे दररोजच्या आजूबाजूच्या हालचाली सहज समजतात.
अशाच एका प्रेयसीने पत्राच्या (Letter) माध्यमातून प्रियकराला संदेश (Messege) देण्याचा प्रयत्न केला आहे. या तरुणीने नोटेवरती विशाल (Vishal) मला घेऊन जा असे म्हटले आहे. मात्र हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
हे पत्र कुसुम नावाच्या मुलीने तिचा प्रियकर विशालला पाठवल आहे. माझं २६ एप्रिलला लग्न आहे. त्याआधी तू मला पळवून घेऊन जा, असं या पत्रास या तरुणीने म्हटले आहे.
मात्र सोशल मीडियावर हे पत्र वाऱ्यासारखे पसरत असून यावर वेगवेगळ्या कंमेंट्स (Comments) येत आहेत. यामध्ये विपुल नावाच्या ट्विटर अकाऊंचवरून (Twitter account) हा व्हीडओ (Video) शेअर करण्यात आला आहे. ‘ट्विटर यूजर्स तुमची ताकद दाखवून द्या. कुसुमचं हे पत्र २६ एप्रिलपूर्वी विशालपर्यंत पोहोचवा.
Twitter show your power… 26th April ke Pehle kusum ka Yeh message vishal tak pahuchana hai.. Doh pyaar karne wale ko milana hai.. Please amplify n tag all vishal you know.. 😂 pic.twitter.com/NFbJP7DiUK
— Crime Master Gogo (PARODY) 🇮🇳 (@vipul2777) April 18, 2022
दोन प्रेमींना एकत्र आणायला हवं. तुमच्या ओळखीच्या विशालला टॅग करा , असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे. हा फोटो सध्या वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. अनेकांनी आपल्या ओळखीच्या विशाल नावाच्या व्यक्तीला हा फोटो फॉरवर्ड केला आहे.
या व्हिडिओ ला नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केली असून एका युजरने लिहिले की, ‘जेव्हा हे पत्र विशालकडे पोहोचेल तेव्हा विशाल दोन मुलांचा मामा बनेलेला असेल’ तर दुसर्याने लिहिलंय, ‘तुमच्या ओळखीच्या सगळ्या विशालला हे पत्र पाठवा दोन जिवांचं मिलन होणं गरजेचं आहे. सध्या असे नोटेवरचे प्रेमपत्र व्हायरल होत असतात.