Health Tips Marathi : सध्या उन्हाळ्याचे दिवस (Summer Days) चालू आहेत, यंदाच्या वर्षी उन्हाळा हा प्रचंड त्रासदायक ठरत आहे. अशा वेळी शरीरातील उष्माघात (Heat stroke) टाळण्यासाठी तुम्ही थंड पदार्थ (Cold foods) खात असाल. मात्र जास्त प्रमाणात उन्हाळ्यात लोक उसाच्या रसाला (sugarcane juice) अधिक पसंती देतात.
उसाचा रस आरोग्यासाठी खूप चांगला असतो, पण योग्य पद्धतीने सेवन न केल्यास तो हानिकारकही असतो. उसाच्या रसात काही हानिकारक जंतू राहिल्यास ते तुमचा जीवही घेऊ शकतात. चला जाणून घेऊयात उसाचा रस आरोग्यासाठी कसा हानिकारक (Harmful) आहे.
उसाचा रस उन्हाळ्यात खूप फायदेशीर असतो, पण जेव्हाही तुम्ही कोणत्याही उसाच्या रसाच्या दुकानात रस पितात तेव्हा दुकानदार उसाच्या रसात भरपूर बर्फ टाकतात. ऊस आणि बर्फामध्ये खूप फरक आहे, ज्यामुळे आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. पुढच्या वेळी बाहेर कुठेतरी उसाचा रस प्यायला तर दुकानदाराला बर्फ टाकायला नकार द्या.
उसाचा रस पिण्यापूर्वी तुम्ही ज्या ठिकाणी रस पीत आहात तेथील दुकानदाराने यंत्र आणि ऊस व्यवस्थित स्वच्छ केला आहे की नाही हे तपासा. कारण उसामध्ये घातक बुरशी असते. तसेच उसामध्ये भरपूर माती आहे. जर दुकानदाराने तुम्हाला उसाचा रस मातीत मिसळून दिला तर तुम्हाला मातीतील अमिबियासिस आणि आमांश सारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
यासोबत लाल रंगाचा उसाचा रस चुकूनही पिऊ नका. असा उसाचा रस तुमचे आरोग्य बिघडू शकतो. लाल रंगाचा उसाचा रस प्यायल्याने त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. लाल रंगाचा उसाचा रस प्यायल्याने लाल कुजाचा रोग होण्याची शक्यता असते.
ही बुरशी आहे, त्यामुळे उसावर लाल रंग दिसून येतो. असा उसाचा रस प्यायल्याने हिपॅटायटीस ए, डायरिया आणि पोटाचे घातक व प्राणघातक आजार होऊ शकतात.