अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Pomegranate Farming :- देशातील अनेक शेतकरी बांधवाना (Farmers) सध्या नैसर्गिक संकटांमुळे शेती व्यवसायात मोठा तोटा सहन करावा लागत आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी शेती मध्ये चांगले दैदिप्यमान यश देखील मिळवले आहे.
आज आपण अशाच एका 33 वर्षीय बिझनेसमॅन विषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी शेतीमध्ये यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. मित्रांनो कोट्यवधी रुपयांचा कपड्यांचा व्यवसाय, दोन जिल्ह्यात कापडाचे कारखाने हे सर्व सोडून 33 वर्षीय तरुणाने डाळिंबाची शेती करण्याचा निर्णय घेतला.

घरच्यांना सांगितल्यावर त्यांनी त्याला साथ दिली नाही, टोमणे मारायला सुरुवात केली, मात्र तरुणाने कोणाचेही ऐकले नाही. या अवलिया तरुणाने शेतीचा आग्रह धरला आणि कपड्यांचा व्यवसाय सोडत डाळिंब शेतीसाठी (Pomegranate Farming) संशोधन सुरु केले.
संशोधन केल्यानंतर 3 वर्षांपूर्वी 5 हजार डाळिंब रोपांची लागवड (Pomegranate Plantation) केली. आज त्यांच्या शेतात 15 हजार डाळिंबाची झाडे आहेत, त्यांना डाळिंब शेतीतुन सुमारे अडीच कोटी रुपये उत्पन्न मिळण्याची आशा आहे आणि यंदा देखील ते डाळिंबाचे पीक घेणार आहेत.
पाली शहरात राहणाऱ्या 33 वर्षीय नितीन कोठारीची ही गोष्ट आहे. बी.कॉम केल्यानंतर तो आपल्या कौटुंबिक व्यवसायाकडे वळला, मात्र आत्मिक समाधान त्याला व्यवसायात मिळत नव्हते.
एका मित्राने त्याला डाळिंब लागवडीची (Pomegranate Orchards) कल्पना दिली. त्यानंतर त्याने डाळिंब शेतीचा अभ्यास करण्याचे ठरवले आणि स्पेनमधील एका संस्थेतून तीन महिन्यांचा ऑनलाइन कोर्स केला.
नितीन सांगतात की, सुरुवातीला घरातील लोक म्हणायचे की एसीमध्ये राहणारा तू शेती कशी करणार आणि नितीनच्या निर्णयाचा कडाडून विरोध केला. नितीनने मात्र आपल्या परिवाराचे ऐकले नाही आणि तीन वर्षांच्या मेहनतीने डाळिंबाची सर्वात मोठी बाग तयार करून दाखवली.
नितीन बोलतांना सांगतात की, जेव्हा त्यांनी 3 वर्षांपूर्वी डाळिंबाची शेती करावी असा विचार केला तेव्हा डाळिंब लागवडीचा हा मार्ग वाटतं आहे तेवढा सोपा नव्हता. कोणीतरी सांगितले की, डाळिंबाची झाडे अगदी पोटच्या मुलांसारखी वाढवावी लागतात.
यामुळे डाळिंब शेतीच्या बारीक-सारीक गोष्टी जाणून घेण्यासाठी नितीनने बंगळुरू येथून कृषी विभागातून डिप्लोमाचा कोर्स केला. यानंतर यूट्यूबवर स्पेन विद्यापीठातून ऑनलाइन डाळिंब शेतीची पद्धत समजून घेतली. एवढेच नाही गुजरात-महाराष्ट्रातील 50 हून अधिक डाळिंबाच्या शेतांना भेटी देऊन संशोधन केले. इतकं सार केल्यानंतर डाळिंबाची शेती नितीनने सुरु केली.
नितीनने पुढे बोलताना सांगतात की, त्यांच्या परिवारांचा 35 वर्षांपासून कापडं मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय आहे. त्यांनी व्यवसायच सांभाळावा अशी कुटुंबाची इच्छा होती. त्यानुसार नितीन यांनी जसोल येथील कारखान्याच कामकाज बघायला सुरुवात देखील केली.
मात्र, प्रदूषणामुळे त्यांचे मन हरपले आणि म्हणून निसर्गाच्या सानिध्यात राहून शेती करण्याचा निर्णय घेतला. घरच्यांना याबाबत कळवल्यावर ते म्हणू लागले की, जो एसीमध्ये बसतो आणि आलिशान गाडीत फिरतो तो शेती कशी सांभाळणार.
मात्र परिवारांच्या विरोधाला न जुमानता नितीन यांनी महाराष्ट्र-गुजरातमधील अनेक शेतांना भेटी देऊन डाळिंबाची लागवड समजून घेतली आणि डाळिंबाची लागवड केली.
आता डाळिंबाची शेती यशस्वी झाल्यानंतर घरातील सदस्यही नितीन चे यश पाहून आनंदित झाले आहेत. विशेष म्हणजे खरेदीदार डाळिंब खरेदी करण्यासाठी थेट नितीनच्या बांधावर पोहोचत आहेत.
नितीनने सांगितले की, तो आता सकाळी साडेपाचच्या सुमारास शेतात पोहोचतो. यामुळे तो मोठा आनंदी आहे. निश्चितच बिझनेस मॅन ते शेतकरी हा नितीन यांचा प्रवास इतर शेतकऱ्यांसाठी मोठा प्रेरणादायी ठरू शकतो.