पाथर्डीचा तरूण इस्त्रीचे कापडे आणण्यासाठी घराबाहेर पडला आणि…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Ahmednagar News :- इस्त्रीसाठी दिलेले कापडे आणण्यासाठी घरातून बाहेर प्रशांत भागचंद शेळके (वय ३३) हा तरूण घरी परतलाच नाही. शोधाशोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा न लागल्याने नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

प्रशांत भागचंद शेळके हा आई-वडिलांसह कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथे राहतो. तो १८ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता इस्त्रीसाठी दिलेले कापडे आणण्यासाठी जातो म्हणून घराबाहेर पडला.

त्यानंतर तो परतलाच नाही. त्याचा मोठे भाऊ योगेश शेळके शहरातील न्यू आर्टस महाविद्यालयात प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या वडिलांनी प्रशांत घरी आला नसल्याची माहिती योगेशला दिली.

यानंतर नातेवाईकांकडे व परिसरात त्याचा शोध लागला नाही. तक्रार दाखल करण्यात आली आहे. रंगाने गोरा, अंगाने मध्यम व उंची सहा फुट असून,

अंगात पांढर्‍या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पँट घातली आहे. कोणाला दिसल्यास व माहिती मिळाल्यास पाथर्डी पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe