अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- श्रीगोंदा ते काष्टी रस्त्यावर होळकर वस्तीनजीक आज दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समजली आहे

मयत झालेला दुचाकीस्वार हा पेडगाव येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे तर स्कॉर्पिओ ही पुणे येथील असून कामानिमित्त ते श्रीगोंदयात आल्याचे समजते स्कॉर्पिओ व दुचाकी यांच्यात जोराची धडक होऊन हा अपघात झाल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे अपघाताबाबत पोलिसांना माहिती देण्यात आलेली आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe