अहमदनगर ब्रेकिंग : ट्रक चालकास कार चालकाने लुटले; रक्कम, मोबाईल पळविला

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- जळगाव येथे जात असताना एका कार चालकाने ट्रक चालकाच्या हातातील पाच हजार रूपये रोख व मोबाईल फोन चोरून नेला.

अहमदनगर शहरातील केडगाव बायपास चौकातून आज पहाटे दोन वाजता ही घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

यशवंत भारत पवार (वय 23 रा. वडगाव मावळ, जि. पुणे, मूळ रा. परभणी) या ट्रक चालकाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी पुणे जिल्ह्यातील उर्से येथील गंगा पेपर मिलमधून पेपर रोल भरून जळगावला जात असताना केडगाव बायपास चौकाजवळील आनंद हॉटेलजवळ ट्रकच्या डाव्या बाजूने एक स्विफ्ट कार गाडीला घासली.

स्विफ्ट चालकाने गाडी आडवी लावून नुकसान भरपाई मागितली. ट्रक ड्रायव्हर खिशातून पैसे काढून दोन हजार रूपये कार चालकाला देत असताना त्याने ड्रायव्हरच्या हातातून पाच हजार रूपये बळजबरीने हिसकाऊन घेतले व मोबाईल घेऊन पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe