मनसे – भाजप युती होणार? फडणवीस म्हणाले, या विषयावर बोलणे उचित नाही

Content Team
Published:

मुंबई : भाजप (Bjp) व मनसे (Mns) युतीबाबत राजकारण अनेक घडामोडी घडत असून या उटीला अजून तरी पूर्णविराम लागलेला दिसत नाही. मात्र युतीबाबत ग्रीन सिग्नल (Green signal) मात्र दिसत आहेत.

कारण भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना यासंबंधी विचारले असता ते म्हणाले की, ‘युतीच्या बातम्या कपोलकल्पित असून काही लोकांनी सोडलेल्या या बातम्या आहेत. आमची अजून अधिकृत चर्चाही झालेली नाही. तसा प्रस्तावही नाही.

मात्र अलिकडच्या काळात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मांडलेल्या भूमिका भाजपाशी सहमत असलेल्या आहेत. मात्र तरीदेखील आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. सध्या या विषयावर बोलणे उचित नाही, असे ते म्हणाले.

तर दुसरीकडे २०१७ ला भाजपा-राष्ट्रवादी (Ncp) युती होणार होती, या गौप्यस्फोटावर जो बीत गयी वो बात गयी, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.

दरम्यान, यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) टीका करताना म्हटले, की भाजपाशासित सर्व राज्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले. गुजरात, दमण दीव, गोवा या आपल्या शेजारच्या राज्यांमध्ये पेट्रोल तब्बल १५ रुपयांनी कमी आहे.

जीएसटीचे (GST) पैसे मिळाले नाहीत, अशी ओरड राज्य सरकार करत आहे. मात्र या पैशांबाबत वित्त राज्यमंत्र्यांनी हा दावा किती खोटा आहे, हे सांगितले आहे. जुलै-ऑगस्टपर्यंत ते पैसे देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे राज्य सरकारने बहाणेबाजी करू नये. जनतेला दिलासा द्यावा, असे फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe