राज ठाकरेंनी अहमदनगरमधील हॉटेल बदलले, त्याचीही चर्चा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Ahmednagar Politics : महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नेहमीच चर्चेत असतात. अलीकडे तर त्यांच्या प्रत्येक कृतीची चर्चा होते. पुण्याहून औरंगाबादला जाताना ठाकरे नगरमध्ये थांबले होते.

यावेळी त्यांनी नगर बायपास चौकातील एका शाकाहारी हॉटेलमध्ये थांबून जेवण घेतले. त्यावरून आता ठाकरे यांच्यातील बदलाची चर्चा सुरू झाली आहे.

पूर्वी एकदा ठाकरे नगरहून जाताना केडगावजवळच्याच एका हॉटेलमध्ये थांबले होते. ते हॉटेल मांसाहारी जेवणासाठी ओळखले जाते. त्याची फार काही चर्चा झाली नव्हती.

मात्र, आता ठाकरे यांनी हनुमान चालीसाचा मुद्दा उचलल्यानंतर त्यावेळी ठाकरे नगरच्या या मांसाहारी हॉटेलमध्ये थांबल्याच्या जुन्या बातम्या सोशल मीडियात शेअर केल्या जात होत्या.

शनिवार असूनही ठाकरे मांसाहारी हॉटेलमध्ये कसे थांबले? असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला होता. त्यानंतर आज शनिवारी ठाकरे पुण्याहून औरंगाबादला जाताना दुसऱ्या शाकाहारी हॉटेलमध्ये थांबले होते.

आता या बदलाचीही सोशल मीडियात चर्चा सुरू झाली आहे. १५ फेब्रुवारी २०२० रोजी ठाकरे औरंगाबादहून पुण्याला जाताना नगरमध्ये थांबले होते. त्यानंतर आज पुन्हा औरंगाबादला जाताना ते नगरमध्ये थांबले पण वेगळ्या ठिकाणी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe