Weather Update : हवामानात मोठा बदल; या भागात होणार पाऊस, तर या ठिकाणी राहणार उष्णतेची लाट

 

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Weather news : आपल्या देशातील बरीच राज्ये उष्णतेची लाटेचा (Heat wave) सामना करत आहेत, मात्र आता उत्तर पश्चिम भारतात रविवारपासून दिलासा मिळाला आहे.

हवामान खात्याने (Weather Department) शेअर केलेल्या माहितीनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे रविवारी दुपारी दक्षिण हरियाणा आणि पूर्व राजस्थानमध्ये पाऊस पडला.

भारतीय हवामान खात्याच्या (Indian Meteorological Department) अंदाजानुसार पुढील पाच दिवस देशातील बहुतांश भागात उष्णतेची लाट असणार नाही. मात्र, मध्य भारत आणि पश्चिम राजस्थान यासाठी अपवाद आहेत या भागात कडाक्याची उष्णता कायम राहणार आहे.

कुठे पडणार पाऊस हवामान खात्याचे शास्त्रज्ञ आर के जेनामानी यांच्या म्हणण्यानुसार, पुढील चार दिवस पश्चिम राजस्थान, महाराष्ट्रातील विदर्भाचा काही भाग वगळता देशाच्या कोणत्याही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही.

दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि हरियाणामध्ये धुळीचे वादळ, 50 किमी प्रतितास वेगाने वादळ आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि पश्चिम राजस्थानच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

उष्णतेने विक्रम मोडला पूर्व उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात शुक्रवारी तापमानाने नवीन विक्रम प्रस्थापित केला. एप्रिल महिन्यातील विक्रमी उच्च तापमान येथे 47.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

शुक्रवारी, उत्तर प्रदेशातील प्रयागराज, झाशी आणि लखनौ, हरियाणाचे गुरुग्राम आणि मध्य प्रदेशातील सतना येथे अनुक्रमे 46.8 °C, 46.2 °C, 45.1 °C, 45.9 °C, 45.3 °C इतके एप्रिलचे सर्वोच्च तापमान नोंदवले गेले.

दुसरीकडे, राजस्थान दिल्लीत गुरुवारी 43.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जे 12 वर्षांतील एप्रिलमधील सर्वाधिक तापमान आहे.

काय म्हणत भारतीय हवामान खात “पुढील दोन दिवसात, वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे,” असे IMD ने एका निवेदनात म्हटले आहे. सोमवारी आपल्या राज्यातील विदर्भमध्ये, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि पश्चिम राजस्थानच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.