अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Corona news : कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर सर्व निर्बंध खुले करण्यात आले. मात्र, चौथी लाट जून महिन्यात येऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञ मंडळी गेल्या महिन्यापासूनच सांगत आहेत.
आता मे महिना सुरू झाल्यावर देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे हा अंदाज खरा ठरणार का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
देशात गेल्या २४ तासात ३१५७ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सध्या देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १९५०० वर पोहोचली आहे.
सर्वाधिक कोरोना रुग्ण राजधानी नवी दिल्लीमध्ये आढळले आहेत. नवी दिल्लीत १४८५, हरियाणामध्ये ४७९, केरळमध्ये ३१४, उत्तर प्रदेशमध्ये २६८ आणि महाराष्ट्रात १६९ करोना रुग्ण आढळले आहेत.
देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी ८६ टक्के रुग्ण या पाच राज्यांमध्ये आढळले आहेत. देशातील गेल्या आठवड्यातील कोरोना आकडेवारीचा विचार करता ४१ टक्के रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलेलं नाही ही दिलासादायक बाब आहे.