“बस्तिया किसने जलाई, बल्की बंदर के हाथो में माशिस किसने दी?” संजय राऊतांची ठाकरेंवर खोचक टीका

Published on -

पुणे : मनसे (MNS) आणि शिवसेनेमध्ये (Shivsena) राज्यात हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्द्यावरून एकमेकांवर जोरदार टीका आणि आरोप करण्यात येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

गेल्या २ दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडिओमधून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना शिवसेनेच्या भूमिकेची आठवण करून दिली होती.

संजय राऊत राज ठाकरेंवर टीका करताना म्हणाले, ‘बाळासाहेबांना जिवंतपणी ज्यांनी त्रास दिला, तेच आता त्यांच्या क्लिप फिरवत आहेत’ अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रकार म्हणून जी क्रांती केली ती शब्दात व्यक्त करता येणार नाही. बाळासाहेबांच्या हातात कुंचला नसता तर आज शिवसेनेचे आंदोलन उभं राहिलं नसतं.

ही मशाल महाराष्ट्रात तुम्हाला पेटती दिसली नसती. आज महाराष्ट्रात पेटवापेटवीची भाषा करत आहेत. आमचं अख्खं आयुष्य पेटवा पेटवीत गेलंय, असा टोलाही त्यांनी लगावलाय.

इतकंच नाही तर सवाल यह नहीं की बस्तिया किसने जलाई, बल्की बंदर के हाथो में माशिस किसने दी? अशा शेरोशायरीद्वारे संजय राऊतांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

गेल्या 15 वर्षात महाराष्ट्रात भोंग्याचा त्रास कुणाला झाला नाही. पण आपले भाऊ मुख्यमंत्री झाले की लगेच त्रास सुरु झाला असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

संजय राऊत यांनी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनाही डिवचले आहे. मला अभिमान आहे पुण्यातील शिवसेना कार्यकर्त्यांचा. त्यांनी महापालिकेच्या पायऱ्यांवर दाखवून दिलं.

कार्यक्रम अजून वाढला असता. आम्ही जेलमध्ये जायला घाबरत नाही. स्वत: शेण खायचं आणि आमच्या तोंडाचा वास घ्यायचा. उद्योगपतींचा माणूस आहे. दलाल आहे, विक्रांतच्या नावावर पैसे जमा केले ते त्यांनी घरात घातले.

हा माणूस फरार होता. आता हा माणूस जामिनावर बाहेर आहे. मात्र दोन दिवसात आरोपपत्र सादर होईल आणि पाच दिवसांत किरीट सोमय्या जेलमध्ये जाणार असा इशाराही त्यांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe