अहमदनगर Live24 टीम, 06 मे 2022 Krushi news :- कांदा म्हटलं कि सर्वप्रथम आठवतो तो कांदा नगरी (Onion Godown) म्हणून नावारूपाला आलेला नाशिक जिल्हा.
देशात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन (Onion Production) घेतले जाते मात्र त्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्राच्या एकूण उत्पादनात मात्र नाशिक जिल्ह्याचा (Nashik) रुतबा हा आजही कायम आहे.
उत्पादनात असो किंवा चवीच्या बाबतीत नाशिक जिल्ह्यातील कांदा सातासमुद्रापार कायम चर्चेत राहतो. याच कांदा नगरी नाशिक जिल्ह्यातून दुबईला कांद्याची निर्यात (Onion Export To Dubai) केली गेली आहे.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याचे मौजे बोराळे येथील एका कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा (Onion Grower Farmer) कांदा थेट त्यांच्या बांधा पासून दुबईला निर्यात करण्यात आला आहे.
यामुळे कांदा नगरी म्हणून प्रख्यात असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बोराळे येथील नवयुवक शेतकरी भिलासाहेब राजपूत यांनी आपला कांदा थेट दुबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवला आहे.
यामुळे परिसरात बळीरामसिंग यांच्या या यशाचे मोठे कौतुक केले जात असून या विषयी मोठ्या चर्चादेखील रंगत आहेत. मौजे बोराळे येथील रहिवासी शेतकरी भिलासाहेब राजपूत हे गेल्या अनेक वर्षांपासून कांदा या नगदी पिकांची शेती करत आले आहेत.
या वर्षी त्यांनी आपल्या अकरा एकर बागायती शेत जमिनीत उन्हाळी हंगामातील कांदा पिकाची लागवड केली होती. या उन्हाळी हंगामात कांदा पिकासाठी विशेष पोषक वातावरण होते तसेच बोराळे व आजूबाजूच्या परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली नसल्याने कांद्याचे पीक अबाधित राहिले व त्यापासून आता चांगले भरघोस उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे.
राजपूत यांच्या शेतातून 55-60 MM आकाराचा मोठा कांदा दुबई निर्यात केला जातं असून लहान आकाराचा कांदा भाव नसल्यामुळे चाळीत साठवण्याच्या कामाची लगबग बघायला मिळाली होती.
कांदा उत्पादक शेतकरी भिलासाहेब राजपूत यांचे पुतणे बलराम सिंग स्वतः आयात निर्यात करत असतात. यामुळे त्यांचे दुबई मध्ये स्थित असलेल्या व्यापाऱ्यांशी चांगले घनिष्ठ संबंध आहेत.
त्यांना याचा फायदा लाभला आणि त्यांचा कांदा थेट बांधावरूनच दुबईला रवाना करण्यात आला. निश्चितच भिलासाहेब यांचा कांदा दुबई रवाना केल्याने त्यांना याचा फायदा झाला असून भविष्यात भिलासाहेब यांच्या प्रमाणेच इतर शेतकरी देखील निर्यातक्षम कांद्याचे उत्पादन घेतील आणि सातासमुद्रापार महाराष्ट्राचा कांदा पाठवतील.