Summer health tips :- उन्हाळ्यात दह्याचे आहारात समावेश केल्याने शरीराला थंडावा मिळेल, व निरोगी राहताल. व आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे.
दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी-६ आणि व्हिटॅमिन बी-१२ सारखे पोषक घटक असतात.
त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि दिसण्याची काळजी असेल तर एक वाटी दही नियमित सेवन केले पाहिजे.
दही अॅसिडिटी दूर करते
अन्न खाल्ल्यानंतर अनेकांना अॅसिडिटीचा त्रास सुरू होतो. जर तुम्हालाही असाच त्रास होत असेल तर जेवणानंतर लगेच किंवा जेवणासोबत एक वाटी साधे दही खा,
हे दही तुमच्या शरीरातील pH चे संतुलन राखेल. तसेच पोटात खाल्ल्याने निर्माण होणारी उष्णता कमी होईल, त्यामुळे अॅसिडिटी होणार नाही. जेवणानंतर दही खाल्ल्याने अन्न सहज पचते.
दह्यात भरपूर कॅल्शियम असते
दह्यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते, ते हाडे मजबूत करते, तसेच दात आणि नखे मजबूत करते, स्नायूंचे योग्य कार्य करण्यास मदत करते.हे स्वादिष्ट तसेच पौष्टिक आहे.
दह्यामध्ये सौंदर्याचा खजिना दडलेला आहे
दही हे निरोगी असण्यासोबतच सौंदर्याचाही चांगला स्त्रोत आहे, उन्हाळ्यात शरीरावर कडक उन्हामुळे त्वचा अनेकदा टॅन होते,
त्यामुळे टॅनिंग कमी करण्यासाठी दही हा एक उत्तम पर्याय आहे. त्याच्या वापराने चेहऱ्यावर चमक येते. दिवसातून २-३ वेळा तोंडाच्या फोडांवर दह्याची मलई लावल्याने फोड निघून जातात.