Cotton Rate: राज्यात खरीप हंगामात (Kharif Season) कापसाचे विक्रमी उत्पादन (Cotton Production) घेतले जाते. मराठवाडा विदर्भ तसेच खानदेश मध्ये कापसाचे सर्वाधिक उत्पादन शेतकरी बांधव (Cotton Grower Farmer) घेत असतात.
विदर्भातील अकोला जिल्ह्यातील अकोट तालुका व आजूबाजूच्या परिसराला कापसाची पंढरी (Cotton Godown) म्हणून ओळखले जाते. आता याच अकोट मधून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी येत आहे.
अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती (Akot Agricultural Produce Market Committee) कापसाच्या खरेदी-विक्रीसाठी राज्यातील एक प्रमुख बाजारपेठ म्हणून उदयास आली आहे. याच बाजार समितीत सध्या कापसाचे विक्रमी आवक होत असून कापसाला चांगला उच्चांकी दर (Cotton Price) देखील मिळत आहे.
यामुळे परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले आहे. एवढेच नाही तर आता कापूस खरेदीला 21 मे पर्यंत मुदतवाढ देखील दिली गेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत अकोट एपीएमसीच्या (Akot APMC) प्रशासनाने निर्णय घेतला असून यामुळे परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार लोक व्यक्त करत आहेत.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 10 मेपर्यंत कापसाची खरेदी होणार होती मात्र परिसरात अद्यापही अनेक शेतकऱ्यांचा कापूस विक्री झालेला नाही यामुळे अकोट एपीएमसी ने एक दिलासादायक निर्णय घेत कापसाची खरेदी 21 मेपर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे
यामुळे निश्चितच परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आव्हान केले की, शेतकरी बांधवांनी आपल्या जवळील कापूस 21 मेपर्यंत बाजार समितीत विक्रीसाठी आणावा तसेच बाजार समितीचे कापूस खरेदी विक्री व्यवहार 21 मेपर्यंत सुरळीत सुरू राहतील असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अकोट एपीएमसीचे सचिव सुधाकर दाळू यांनी यावेळी प्रसार माध्यमांना माहिती देताना याविषयी शेतकऱ्यांना अवगत केले.
अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस विक्री करण्याचे कारण
अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत अकोट समवेतच आजूबाजूच्या परिसरातील अनेक कापूस उत्पादक शेतकरी आपला कापूस विक्रीसाठी आणत असतात. अकोट एपीएमसीमध्ये कापसाला शेतकऱ्यांच्या पुढे बोली लावून कापसाची खरेदी केली जाते.
विशेष म्हणजे बोली दरम्यान चांगल्या कापसाला कमी भाव मिळाला तर अकोट एपीएमसी प्रशासन यामध्ये हस्तक्षेप करते. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अकोट एपीएमसीमध्ये कापूस विक्री करण्यास अधिक पसंती दर्शवित असल्याचे जाणकार सांगत आहेत. निश्चितच आकोट एपीएमसीचा हा पारदर्शी व्यवहार शेतकऱ्यांना रास येत आहे.
कापसाला मिळतोय ऐतिहासिक दर
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, अकोट एपीएमसी मध्ये जानेवारी महिन्यात कापसाला साडे दहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा उच्चांकी दर मिळाला होता. जानेवारी महिन्यापासून अकोट एपीएमसीमध्ये कापसाच्या दरात नेहमी सुधारणा बघायला मिळाली असून
सध्या कापसाला साडेबारा हजार रुपये प्रति क्विंटलहुन अधिक दर मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी सुखावला असल्याचे चित्र यावेळी बघायला मिळत आहे. यामुळे विदर्भातील बहुतांशी कापूस उत्पादक शेतकरी अकोटकडे आपला मोर्चा वळवत आहे.