‘नमामि गंगे’साठी राहुरी कृषी विद्यापीठाचा करार

Ahmednagar News: केंद्र सरकारने गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी नमामि गंगे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी तांत्रिक योगदान देण्यासाठी राहुरीच्या महात्मा फुले कृषी कानपूरच्या आयआयटी संस्थेसोबत सांमज्य करार होत आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी दिली.

संपूर्ण देशातून राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाची यासाठी निवड झाली आहे. याच्या पूर्व तयासाठी नुकतीच बैठक झाली. आयआयटी कानपूरचे प्राध्यापक विनोद तारे यावेळी उपस्थित होते.

त्यांनी सांगितले, ‘नमामि गंगे प्रकल्पासाठी कृषी विषयक जे जागतिक तंत्रज्ञान चांगले आहे ते भारतात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. भारतातील नद्या व त्यातील पाणी हे शेतीसाठी महत्वाचा विषय आहे. नद्या शाश्वत राहण्याच्या दृष्टीने भविष्यात काम करावे लागणार आहे, त्यासाठी कृषी विद्यापीठाची मदत होणार आहे.’