काल मुख्यमंत्र्यांची सभा तर आज अजित पवारांची सावध भूमिका; म्हणाले, तोपर्यंत मी बोलणार नाही..

Ahmednagarlive24 office
Published:

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल मुंबईमध्ये (Mumbai) बीकेसी मैदानावर जाहीर सभा झाली. जवळपास एक तास केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली आहे.

तसेच उद्धव ठाकरे यांनी काल पहाटेच्या शपथविधीवरून आम्ही राष्ट्रवादीशी (Ncp) युती केली तर गद्दारी आणि तुम्ही केली तर काहीच नाही. तुमचा पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर आज नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख तुमच्या मांडिला मांडी लावून बसले असते, असा हल्ला चढवला आहे.

यावर आज पत्रकार परिषदमध्ये (press conference) उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी बोलताना सावध भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, मागे त्याच दिवशी सांगितलेलं आहे. मला ज्या वेळेला वाटेल तेव्हा सांगेल. मला आताच वाटत नाही सांगावं. संपला विषय. मी त्याचवेळी स्टेटमेंट केलं आहे.

तुम्ही कितीही घोळून विचारलं तरी जोपर्यंत अजित पवारांच्या मनात येत नाही तोपर्यंत तो बोलणार नाही. आता तो विषय इतका महत्त्वाचा आहे का? अडीच वर्ष झाले पाणी वाहून गेलं. सरकार आलंय. सर्व काम करत आहेत, असे अजित पवार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्र मध्ये जे चालेल आहे ते मला पटत नाही. सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणतो आपण. सरकार येत असतात सरकार जात असतात ताम्रपट कोणीही घेऊन आले नाही.

मॅजिक फिगर कोणीही घेऊन आले तर सरकार पडू शकते. खऱ्या अर्थाने आज महागाईचा प्रश्न आहे. पेट्रोल, डिझेल गॅस वाढले आहे. उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सगळ्यांनी मिळून या गोष्टीला प्राधान्य दिले पाहिजे.

काही जण माथी भडकवण्याचे काम करत आहेत. भोंग्यावरून जे सुरू आहे. त्यावर ज्यांनी बोलायचे त्यांनी बोलावं. मुख्यमंत्री पण इतके दिवस शांत होते. सर्वांनी जातीपंथांना त्रास होणार नाही असे पाहिले पाहिजे, असेही यावेळी अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe