Ahmednagar Accident : अहमदनगरमध्ये भीषण अपघातात चौघांचा मृत्यू !

Published on -

Ahmednagar Accident :- अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे,

नगर-मनमाड राज्य महामार्गावर गुहा पाट नजीक एका बसचा आणि चार चाकी वाहनाचा भीषण अपघात झाला.

या अपघातात चार जण ठार झाले आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे.

मृतांमध्ये 1 पुरुष 2 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे.

आज रविवारी दुपारच्या दरम्यान नगर कडुन शिर्डिकडे चाललेली बस

तर मध्य प्रदेश येथील चार चाकी गाडी क्र. Mp 10 cb 1236 हि पुण्याकडे चालली असताना

नगर-मनमाड राज्य महामार्गावर गुहा पाठ नजिक समोरासमोर हा भीषण अपघात घडला.

अपघात इतका भयंकर होता की चार चाकी गाडीचा चक्काचूर होऊन यामध्ये चार जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News