पालघर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण भोंग्याच्या मुद्द्यावरून तापल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच विरोधकांकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.
याच मुद्द्यावरून शिवसेना (Shivsena) नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना टोला लगावला आहे.

विनायक राऊत म्हणाले, राज ठाकरेंच्या भोंग्याला आम्ही काडीची किंमत देत नाहीत. आताच यांचा भोंगा का वाजला. भाजपाच्या (BJP) तालावर नाचणारे राज ठाकरे आहेत अशी घणाघाती टीका त्यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे.
तसेच भोंग्याचा विषय हा केवळ राज्याचा नाही तर केंद्राचा आहे. यावर पंतप्रधानांनी विचार करायला हवा असेही विनायक राऊत म्हणाले आहेत.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, सध्या राज्यात विरोधकाकडून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाची कीव येतं असल्याचेही खासदार विनायक राऊत सांगितले आहे.
सध्या देशातील वाढलेल्या महागाईवर लोकांना दिलासा देण्याऐवजी केवळ महाविकास आघाडीचे नेतृत्व बदनाम करून, सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपा कडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली. त्यावर नाव न घेता विनायक राऊतांनी तिच्यावर टीका केली आहे.
ज्यांना अक्कल दाड ही आली नाही, ते शरद पवार यांच्यावर टीका करीत आहेत. अशा विकृती आता महाराष्ट्रात वाढत आहेत. अशा विकृतीला आता कायमचे नष्ट करून, एक सुसंस्कृत राज्य निर्माण करण्याची गरज आहे. असेही ते म्हणाले.