“उत्पादनात वाढ होईल शिवाय शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटही ओढावणार नाही” अजित पवारांचे सूतोवाच

Ahmednagarlive24 office
Published:

मुंबई : राज्याचे उपमुख्यंमत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुंबई मध्ये बोलत असताना यंदाच्या मान्सून विषयी भाष्य केले आहे. तसेच शेतकऱ्यांना (Farmers) दुबार पेरणीचे संकट ओढावणार नसल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवार म्हणाले, गतवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे (Kharif Season) खरीप हंगामातील उत्पादन घटले होते. यंदा हंगाम सुरु होण्यापूर्वीच (Meteorological Department) हवामान विभागाने शुभसंकेत दिले आहेत.

मान्सूनचे (Monsoon) वेळेत आगमन होणार असल्याने उत्पादनात वाढ होईल शिवाय शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटही ओढावणार नाही. त्यामुळे पावसाला सुरवात होण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी खरीप हंगामपूर्व मशागतीची कामे उरकणे गरजेचे असल्याचा सल्ला अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

शिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य सरकार तर प्रयत्नशील राहणारच आहे. मात्र, शेतकऱ्यांनीही कुठेही कमी न पडता उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, नियमित कर्ज अदा कऱणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारने सत्ता स्थापनेच्या दरम्यान केलेल्या कर्जामाफी वेळी केली होती.

मात्र, अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. मध्यंतरी तिजोरीत खडखडाट होता तर पुन्हा राज्यावर कोरोनाचे संकट ओढावले होते. त्यामुळे ही रक्कम देणे शक्य झाले नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते.

मध्यंतरी अर्थसंकल्पीय अधिवनेशनात ही रक्कम शेतकऱ्यांना त्वरीत देण्याची घोषणा त्यांनी केली होती मात्र, अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना 50 हजार रकमेतून प्रोत्साहनच मिळालेले नाही.

प्रादेशिक कृषी प्रशिक्षण संस्थेचे काम तब्बल 10 वर्षापासून सुर आहे. 10 वर्ष काम रेंगाळणे म्हणजे हा आमचा अपमान असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना खडसावले आहे.

काम पूर्ण होईपर्यंत त्यामध्ये सातत्य राहिले तरी दर्जाही टिकवता येतो. आता अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून काम पूर्ण करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत.

अजित पवार यांनी राज्याच्या राजकारणावर भाष्य करत विरोधकांवरही टीका केली आहे. ते म्हणाले, राज्याचे राजकारण हे खालच्या पातळीवर आले आहे. यामुळे सामाजिक सलोखा टिकून राहतो की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

महाराष्ट्राची ही संस्कृती नाही पण काही जणांकडून तेढ निर्माण करण्याचे काम सुरु आहे. जे राज्यासाठी धोक्याचे आहे. राजकीय स्वार्थासाठी कोणत्या पातळीवर जावे यासाठीही काही मर्यादा आहेत.

केवळ एखादा मुद्दा घेऊन शांतता भंग केली जात आहे. जनतेचे प्रश्न, विकासाचे राजकारण करण्याची खरी गरज असताना वेगळेच मुद्दे घेऊन जनतेचे लक्ष विचलीत केले जात असल्याचेही पवार म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe