फडणवीसांचे महाराष्ट्राचा लचका तोडण्याचे स्वप्न, त्यांच्या मालकांनी त्यांना वेळीच आवर घालायला हवा, नाहीतर…

Ahmednagarlive24 office
Published:

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राचा (Maharashtra) लचका तोडण्याचे स्वप्न पाहिले, अशी थेट टीका आज सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांवरती केली आहे.

तसेच “शिवसेनेने (Shivsena) बलिदाने दिली व समस्त ठाकरे कुळाने वाघाच्या छातीने संघर्ष केला. म्हणून आज मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्र दिल्लीपुढे (Delhi) न झुकता उभा आहे.

फडणवीस व त्यांचे सर्वच बापजादे महाराष्ट्राचा लचका तोडण्याचे स्वप्न पाहत होते, ‘महाराष्ट्र दिनी’ दंडास काळया फिती बांधून १०५ हुतात्म्यांचा अपमान करीत होते. तेव्हा ‘ठाकरे’ अखंड महाराष्ट्रासाठी वाघाचे पंजे मारीत होते.

आज मुंबई विदर्भ महाराष्ट्रापासून तोडण्याची कोणाची औकात नाही ती फक्त ठाकरे व शिवसेनेमुळेच. फडणवीस यांची गाडी उताराला लागली आहे व भांडे घरंगळत आहे. ते वैफल्यग्रस्त असल्याने बेभान झाले आहेत, हे असेच राहिले तर महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे अस्तित्व संपून जाईल असे थेट सामनाच्या अग्रलेखातून सांगण्यात आले आहे.

त्याचसोबत सध्या १७० चे बहुमत ठाकरे सरकारकडे (Thackeray government) आहे. त्यामुळे फडणवीस गरजतात तसा ढाचा वगैरे कधीचं पडणार नाही. त्यांनी बाबरीही स्वप्नात पाडली होती.

राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या बाबतीत हा स्वप्नदोष कधीचं शक्य नाही. आयोध्येत जेव्हा बाबरी पाडली तेव्हा तिथ असलेल्या भाजपाने तिथून पळ काढला. विशेष म्हणजे तो दिवस त्यांच्यासाठी काळा दिवस होता. असेही सामनामध्ये म्हटले आहे.

तसेच वैफल्यग्रस्त विरोधी पक्षांची गाडी सध्या बेभान अवस्थेत आहे, अशा गाडीला ब्रेक लावणे अत्यंत कठीण असते. फडणवीसांचे सुध्दा असेल झाले आहे. फडणवीसांच्या मालकांनी त्यांना वेळीच आवर घालायला हवा, नाहीतर महाराष्ट्रात त्यांचा अपघात होण्याची शक्यता आहे.

त्यांचा अपघात झाल्यानंतर दिल्लीतला तंबू सुध्दा आपोआप हलू लागेल. मुख्यमंत्र्यांच्या सभेला देवेंद्र फडणवीस हे चांगले उत्तर देतील असं वाटलं होतं. परंतु त्यांना शक्य झालं नाही असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe