अपघातानंतर आमदार जगताप यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आज पहाटे मुंबईजवळ झालेल्या भीषण अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर रसायनीजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला.

यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.जगताप म्हणाले, एवढा भीषण अपघात असूनही आम्ही सुखरूप आहोत. साधी दुखापतही झाली नाही. नगरकर जनतेचे प्रेम आणि आशिवार्दाचे सुरक्षाकवच सोबत आहे.

ते आज कामाला आले. मी सुखरूप आहे. मुंबईत पोहोचलो असून नेहमीची कामे सुरू केली आहे. आपल्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी चिंता करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.पहाटे झालेल्या या अपघाताची माहिती भल्या सकाळीच नगरमध्ये येऊन धडकली.

अपघाताची छायाचित्रे आणि त्यात जगताप यांच्या वाहनाची झालेली अवस्था पाहून नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात होती. अनेकांनी जगताप आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांशी संपर्क केला. अनेकांचा संपर्क होऊ शकत नव्हता. त्यामुळे आता स्वत: आमदार जगताप यांनीच आपण सुखरूप असल्याचे कळविले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe