आमदार रोहित पवार म्हणतात: हो…! माझा अधिकाऱ्यांवर माझा दबाव मात्र …?

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar Politics : मतदारसंघात विकासकामे करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच मंत्रीमंडळातील सर्व मंत्र्यांचे मोठे सहकार्य मिळत आहे. यातूनच वीज, रस्ते, व पाणी या कामांबरोबरच सर्व सामान्य जनतेपर्यंत वैयक्तिक शासकीय योजना पोहचवण्याचा माझा प्रयत्न असतो.

यामुळे माझा अधिकाऱ्यांवर दबाव असतो मात्र तो सर्वसामान्य जनतेच्या कामांसाठीच असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, मतदारसंघातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग असो कि, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत रस्त्यांची कामे असो या कामांचा आढावा घेऊन चांगल्या दर्जाची कामे होण्यासाठी मी बैठका घेत असतो. आतापर्यंत ४५० पानंद रस्ते केले असून आणखी १२०० असे एकुण १४ कोटी रुपयांचे पानंद रस्ते तयार करायचे आहेत.

सामान्य जनतेची कामे करतानाच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचेही काम केले आहे. प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी एका ठिकाणी थांबले पाहिजेत, त्यामुळे नागरिकांच्या अडचणी सोडविण्यास मदत होईल.या साठी पंचायत समिती, तलाठी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासाचे काम सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe