AhmednagarLive24;हनीट्रॅपच्या गुन्ह्यामध्ये गेल्या एक वर्षापासून पसार असलेल्या आरोपी सागर साहेबराव खरमाळे (वय 35 रा. शिवाजीनगर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 20 हजार रूपयांचे दोन मोबाईल जप्त केले आहे.
आरोपी खरमाळेने एका महिलेसह त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने एका अधिकार्यावर हनीट्रॅप करून फसवले होते. तसेच अधिकार्याकडे वारंवार दोन कोटी रूपयांची मागणी करण्यात येत होती. नगर तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.
आरोपी खरमाळे बोल्हेगाव परिसरात येणार असल्याची माहिती नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे नगर तालुका पोलिसांनी सापळा लावून आरोपी खरमाळेला अटक केली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप, पोलीस अंमलदार दिनकर घोरपडे, संतोष लगड, सचिन वणवे, राहुल शिंदे, जयश्री फुंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.