Successful Farmer: इंजिनीयर रिटायर्ड झाला आणि ड्रॅगन फ्रुटची शेती सुरू केली; आज कमवतोय लाखों

Ahmednagarlive24 office
Published:

Successful Farmer: मित्रांनो अनेक लोक रिटायरमेंट नंतर आपला वेळ परिवारासमवेत घालत असतात. रिटायर झाले म्हणजेच कामापासून देखील दुरावत असतात. मात्र गुजरात मध्ये असा एक अवलिया आहे जो रिटायरमेंट नंतर देखील लाखो रुपये कमवत आहे. मित्रांनो हा अवलीया आहे सुरत मधील जसवंत पटेल.

सुरत येथे वास्तव्यास असणारे जसवंत पटेल हे 2014 मध्ये निवृत्त झालेत. मात्र नेहमीच काहीतरी नवीन करण्याची जिज्ञासा असल्याने जसवंत यांनी रिटायर्ड झाल्यानंतर शेती (Farming) करण्याचा निर्णय घेतला. जसवंत गेल्या 4 वर्षांपासून ड्रॅगन फ्रूटची शेती (Dragon Fruit Farming) सुरु केली आहे.

आजच्या मितीला त्यांच्याकडे विविध जातींची 7 हजारांहून अधिक ड्रॅगन फ्रूटची रोपे (Dragon Fruit) आहेत. या रोपांची ते गुजरात तसेच मध्य प्रदेश, राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये विक्रीदेखील करत आहेत. जसवंत यांच्या मते, यातून त्यांना दरवर्षी 8 लाख रुपयांचा नफा मिळत आहे.

जसवंत सांगतात की, 2014 मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांना काहीतरी नवीन आणि आपल्या मनासारखे जरा हटके करायला वेळ मिळाला. काही दिवस त्यांनी वेगवेगळ्या वनस्पतींवर संशोधन केले आणि मग ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्याचा निर्णय घेतला.

मात्र, तेव्हा त्याची संकल्पना पूर्णपणे नवीन होती आणि फार कमी शेतकरी ड्रॅगन फ्रुटची लागवड करत असत. म्हणूनच त्यांनी 15 रोपांपासून सुरुवात केली जेणेकरून त्यांना यश मिळाले नाही तरी नुकसान कमी होईल.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, 2017 मध्ये जसवंत यांनी व्यावसायिक स्तरावर ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्यास सुरुवात केली. त्यांनी देशातील विविध ठिकाणांहून चांगल्या प्रकारची रोपे आणली आणि सुमारे 6 एकर शेतीजमिनीवर शेती सुरू केली.

दोन वर्षांनंतर म्हणजेच 2019 मध्ये त्यांना ड्रॅगन फ्रुटच्या शेतीतून चांगला बक्कळ पैसा मिळाला. चांगला प्रतिसाद मिळाल्याने जसवंत यांच्या आशा पल्लवित झाल्या. आणि मग काय ड्रॅगन फ्रुटच्या शेतीत अजून जोमाने काम सुरू झाले. त्यांची बहुतेक झाडे तयार झाली आणि मिळण्यास सुरवात झाली. त्यानंतर त्यांनी सुरत आणि आसपासच्या भागात त्याचे मार्केटिंग सुरू केले.

जसवंत सांगतात की, सध्या त्यांच्याकडे 1800 खांब आहेत. एका खांबावर सुमारे 4 झाडे आहेत. अशा प्रकारे, सध्या जसवंत यांच्याकडे 7 हजारांहून अधिक ड्रॅगन फ्रुटची झाडे आहेत. यासोबतच त्यांनी नुकतीच ट्रॉली सिस्टीम असलेली 500 रोपे बसवली आहेत.

जर आपण जातीबद्दल बोललो तर त्यांच्याकडे सध्या एकूण 7 वाण आहेत. त्यापैकी थायलंड, व्हिएतनाम आणि ऑस्ट्रेलियातील प्रगत वाणाचा देखील समावेश आहे. त्यांच्याकडे ड्रॅगन फ्रुटच्या लाल, पिवळ्या आणि पांढऱ्या या तिन्ही प्रकारच्या वनस्पती आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe