मलाही ईडीची नोटीस दिली, दम असेल तर मला उचलून दाखवून कारवाई करावी

Ahmednagarlive24 office
Published:

अमरावती : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्यातल्या ईडीच्या कारवाईवरून (ED Notice) केंद्रीय तपास यंत्रणांवर सवाल उपस्थित केले आहेत.

यावेळी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना प्रकाश आंबेडकर यांची जीभ घसरली आहे. ते म्हणाले, देशात भाजपने (Bjp) दडपशाहीचे राजकारण सुरू केलं आहे. उठ सूट कोणालाही ईडीच्या नोटीस दिल्या जात आहेत.

भाजपाने देशात मोकळं वातावरण ठेवलं नाही. मलाही ईडीची नोटीस दिली होती. दम असेल मला उचलून दाखवून कारवाई करावी, असे थेट आवाहन वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला दिलं आहे.

तसेच यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरून (OBC reservation) प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, ओबीसी आरक्षण मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) लागू झाले. मग महाराष्ट्रात का नाही, यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, यासंदर्भात मी दोन दिवसांत स्वतंत्र भूमिका मांडणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे टीव्हीशी बोलतात. पण, त्यांनी त्याऐवजी वकिलांशी (Advocate) खुली चर्चा करावी. त्यातून काहीतरी मार्ग निघेल. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायला नकोत, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

त्याचसोबत ते म्हणाले, राज्यातील राजकीय पक्ष (Political Party) हे गुलाम झाले आहेत. त्यांनी वकिलांशी चर्चा करून त्यातून मार्ग काढावा. श्रीमंत मराठा गरिबांशी इमानदारी राखू शकत नाही.

ओबीसींनी आता भूमिका घेतली पाहिजे की, सत्ताधारी श्रीमंत मराठ्यांना मतदान करणार नाही. तरच ओबीसींचं आरक्षण त्यांना मिळेल अन्यथा नाही, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe