Pm Kisan Yojana: आता उरले फक्त 9 दिवस; 10 व्या दिवशी फिक्स जमा होणार 2 हजार; पण ‘हे’ काम करा नाहीतर दोन हजार विसरा

Published on -

Pm Kisan Yojana : मित्रांनो मोदी सरकारने (Modi Government) देशातील शेतकऱ्यांच्या (Farmers Scheme) भल्यासाठी वेगवेगळ्या योजना (Sarkari Yojana) कार्यान्वित केल्या आहेत. या पैकीच एक आहे पीएम किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Yojana).

विशेष म्हणजे ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना आहे. सध्या देशातील कोट्यावधी शेतकरी बांधव पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 11वा हप्ता मिळण्याची वाट पाहत आहेत. तुम्हीही 11व्या हफ्त्याच्या 2000 रुपये मिळण्याची वाट पाहत असाल तर आता तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार, पीएम किसान या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेचा पुढचा हप्ता 9 दिवसात शेतकरी बांधवांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे. परंतु शेतकऱ्यांना योजनेसाठी दिलेली सर्व महत्त्वाची कागदपत्रे नीट तपासून पहावी लागणार आहेत. जेणेकरून हप्त्यादरम्यान शेतकऱ्यांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.

केवायसी आहे महत्वाची प्रक्रिया
या मोदी सरकारच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना प्रथम PM किसान योजनेशी संबंधित KYC प्रक्रिया योग्य प्रकारे पूर्ण करणे आवश्यक आहे. जर तुम्ही कोणत्याही कारणाने ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर 11 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत.

अशी चेक करा लिस्ट
11 वा हप्ता मिळविण्यासाठी, तुम्हाला प्रथम PM किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल.
यानंतर तुम्हाला साइटच्या डॅशबोर्ड पर्यायावर क्लिक करावे लागेल.


त्यानंतर तुमच्या समोरील नवीन पेजमध्ये तुम्हाला ‘व्हिलेज डॅशबोर्ड’ या पर्यायावर जावे लागेल. जिथे तुम्हाला तुमची सर्व आवश्यक माहिती भरायची आहे.
यानंतर, जर तुम्हाला या योजनेशी संबंधित कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल, तर त्या संबंधित पर्यायावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण तपशील सहजपणे जाणून घेऊ शकता.
अशा प्रकारे या योजनेशी संबंधित सर्व यादी तुमच्या स्क्रीनवर उघडेल.

या दिवशी पैसे येतील
मित्रांनो केंद्र सरकारने PM किसान सन्मान निधी योजनेसाठी KYC अपडेट करण्याची अंतिम तारीख 31 मे पर्यंत वाढवली आहे. जर कोणत्याही शेतकरी बांधवाने त्यांची KYC संबंधित प्रक्रिया अद्याप पूर्ण केली नसेल, तर तो या कालावधीत ती पूर्ण करू शकतो.

त्यानंतरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजाराचा हफ्ता जमा होणार आहे. एका अहवालानुसार, येत्या काही दिवसांत पीएम किसान योजनेच्या 11व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येतील असा दावा केला जातं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा 11वा हप्ता अवघ्या 9 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe