Ahmednagar Rain : यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेआधी होण्याचा अंदाज हवामान विभागाने पूर्वीच वर्तविला होता. त्यानुसार त्याची वाटचालही सुरू झाली आहे. मात्र, अहमदनगरमध्ये मान्सून केव्हा पोहचणार याची उत्सुकता आहे.
यासंबंधीही आता हवामान विभागाने महत्वाची माहिती दिली आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी सध्या अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. अंदमानमध्ये दाखल झालेला मान्सून येत्या दोन दिवसांत केरळमध्ये आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकणात पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
![rain_19](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2022/05/rain_19.webp)
उर्वरित महाराष्ट्रात पाच जूनपर्यंत मोसमी पाऊस पोहोचू शकतो. तर १२ जून ते १५ जून या कालावधीत संपूर्ण राज्यभरात मोसमी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अहमदनगरमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.