ठाकरे सरकारकडुन राज्यातील जनतेला गिफ्ट ! पेट्रोल आणि डिझेल झाले इतके स्वस्त…

Published on -

Maharashtra news : केंद्र शासनाने पेट्रोल आणि डिझेल चे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आजपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (VAT) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे.

यामुळे वार्षिक सुमारे २५०० कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.मात्र राज्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने कर कपात केल्यानंतर राज्य सरकारवरही यासाठी दबाव आणला जात होता. त्यामुळे अखेर राज्य सरकारनेही हा निर्णय घेतला आहे. अर्थात केंद्राच्या तुलनेत ही कपात कमीच आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News