Maharashtra news : विविध मागण्यांसंबंधी पुणतांब्यांतील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे. यासंबंधी निर्णय घेण्यासाठी सोमवारी (२३ मे) ग्रामसभा बोलविण्यात आली आहे.
सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. यासंबंधी डॉ. धनवटे यांनी सांगितले की, ‘ग्रामसभेत शेतकऱ्यांच्या मागण्यांचे पाच ते सहा ठराव करून सरकारला पाठविण्यात येणार आहेत.

त्यावर सरकारने निर्णय घेणे अपेक्षित आहे. योग्य प्रतिसाद न मिळाल्यात एक जूनपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होणार आहे. आंदोलनाची दिशा राज्यातील शेतकरी संघटनांशी चर्चा करून ठरविण्यात येणार आहे,’ असेही डॉ. धनवटे यांनी सांगितले.