पेट्रोल पंपावरील उभा असलेल्या टँकरला आग लागली आणि…

Published on -

Ahmednagar News : पेट्रोल पंपावर उभा असलेला टँकरने अचानक पेट घेतल्यामुळे चांगलीच धावपळ उडाली. आज दुपारी चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान विळद घाट (ता. नगर) येथील एका पेट्रोल पंपावर ही घटना घडली.

एमआयडीसीच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. टँकर शेजारी असलेल्या झाडाझुडपांना लागलेल्या आगीमुळे टँकरने पेट घेतल्याचे सांगितले जात आहे.

टँकर अचानक पेटल्याने पंपावरील कामगार व वाहनात पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. एमआयडीसीच्या अग्निशमन विभागाला याची तात्काळ माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. या आगीत टँकर जवळपास पूर्णपणे जळून खाक झाला आहे.

टँकरशेजारी असलेल्या गवत व झाडाझुडुपांमध्ये आग लागली व त्यामुळे टँकरने पेट घेतला, असे सांगितले जात आहे. सदरचा टँकर तेथे पार्क करण्यात आलेला होता. हा डिझेलचा टँकर असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत खात्री झाली नाही. एमआयडीसी पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe