Mansoon 2022: पुढील 3 दिवस पावसाचे; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात धो-धो बरसणार पाऊस

Published on -

Mansoon 2022 :देशात गेल्या दोन तीन दिवसांपासून वातावरणात मोठा बदल बघायला मिळतं आहे. देशात अनेक ठिकाणी आता मान्सूनपूर्व पावसाची (Pre Mansoon Rain) हजेरी देखील बघायला मिळतं आहे. आपल्या राज्यातही सध्या मान्सूनपूर्व पाऊस (Maharashtra Pre Mansoon Rain) कोसळणार असल्याचे वातावरण बघायला मिळत आहे.

गत चार पाच दिवस पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) अनेक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन बघायला मिळाले. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच विदर्भातील तुरळक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचे आगमन बघायला मिळाले. मात्र त्यानंतर राज्यातील वातावरण निरभ्र असल्याचे बघायला मिळाले.

मात्र पुन्हा एकदा राज्यात वरुणराजा हजेरी लावणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस बघायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते (Indian Meteorological Department), पुढील तीन दिवस राज्यातील पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि खानदेश मधील अनेक जिल्ह्यात पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD Alert) पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग आणि राजधानी मुंबई तसेच खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच विदर्भातील यवतमाळ या जिल्ह्यात पुढील तीन दिवस मान्सूनपूर्व पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या दरम्यान कोकण आणि विदर्भात चार दिवस मेघगर्जना आणि विजेचा कडकडाटात पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे.

हवामान विभागाच्या मते राजस्थानच्या उत्तर पूर्व भागापासून ते अरबी समुद्राच्या उत्तर पूर्व भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याशिवाय उत्तर पूर्व राजस्थान ते बंगालच्या उपसागरापर्यंत हवेच्या वरच्या थरात चक्रीय पट्टा तयार झाला आहे.

यामुळे मान्सूनपूर्व पावसाची परिस्थिती तयार झाल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान मान्सूनच्या प्रवासात अडथळे निर्माण होत असल्याने मान्सून दोन दिवस उशिरा महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगितले गेले आहे.

यामुळे मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसमवेतच सामान्य नागरिकांना प्रतीक्षेत अजून वाढ झाली आहे. आता मान्सून सहा जून रोजी तळकोकण गाठणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र असे असले तरी, राजधानी मुंबईत मान्सूनपूर्व पाऊस दस्तक देणार असल्याने मुंबई वासियांना उकाड्यापासून मोठा आराम मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!