Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या अनेक दिवसांपासून हवामान (Climate) जैसे थे बघायला मिळतं आहे.
राज्यात अंशतः ढगाळ वातावरण (Cloudy Weather) असल्याने उष्णतेचा प्रकोप कमी झाला आहे.दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने (Pre Mansoon Rain) हजेरी लावल्याने राज्यात आल्हाददायक वातावरण आहे. शिवाय उकाड्यापासून हैराण झालेल्या जनतेस गारव्याची अनुभूती होत आहे.

यामुळे तूर्तास तरी राज्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस हवामान असेच कायम राहणार आहे.
आज गुरुवारी राज्यात पावसाची शक्यता नसली तरी देखील राजधानी मुंबईसह राज्यातील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज आहे. याशिवाय कमाल तापमान 40 अंशांच्या खाली नोंदवले जाण्याची शक्यता आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे आजचे हवामान.
राजधानी मुंबईचा आजचा हवामान अंदाज:- आज गुरुवारी 26 मे रोजी राजधानी मुंबईत जास्तीत जास्त तापमान 35 आणि कमीत कमी तापमान 28 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे.
दुपारनंतर मात्र राजधानीत हलके ढगाळ वातावरण राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) स्पष्ट केले आहे.
पुण्याचा आजचा हवामान अंदाज:- आज गुरुवारी 26 मे रोजी पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात जास्तीत जास्त तापमान 37 तर कमीत कमी तापमान 23 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
विशेष म्हणजे राजधानी मुंबईप्रमाणेच आज पुण्यात देखील दुपारनंतर ढगाळ वातावरण बघायला मिळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे. 31 मे पर्यंत पुण्याचे वातावरण असेच राहील असे देखील भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
नागपूरचा आजचा हवामान अंदाज:- आज गुरुवार 26 मे रोजी विदर्भातील प्रमुख शहर नागपुरात जास्तीत जास्त तापमान 41 अंश सेल्सिअस तर कमीत कमी तापमान 27 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे.
या दरम्यान अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
नाशिकचा आजचा हवामान अंदाज:- आज गुरुवार 26 मे रोजी पश्चिम महाराष्ट्रातील नाशिकमध्ये जास्तीत जास्त तापमान 36 अंश सेल्सिअस तर कमीत कमी तापमान 23 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे.
मुंबईप्रमाणेच नाशिक मध्ये देखील दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
औरंगाबादचा आजचा हवामान अंदाज:- आज गुरुवार 26 मे रोजी मराठवाड्यातील प्रमुख शहर औरंगाबादमध्ये जास्तीत जास्त तापमान 38 अंश सेल्सिअस तर कमीत कमी तापमान 23 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे.
यादरम्यान मात्र औरंगाबाद शहरातील हवामान स्वच्छ राहील असे विभागाने स्पष्ट केले आहे.